Lockdown in Raigad : रायगड जिल्ह्यात तीस नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:43 AM2020-11-04T00:43:32+5:302020-11-04T00:43:54+5:30

Lockdown in Raigad district till November 30 : या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

Lockdown in Raigad district till November 30 | Lockdown in Raigad : रायगड जिल्ह्यात तीस नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन 

Lockdown in Raigad : रायगड जिल्ह्यात तीस नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन 

Next

अलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी कुठेही एकत्र येऊन समारंभ वा उत्सव साजरा करू नये, म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हाभरात कलम १४४ नुसार सुधारित प्रतिबंधात्मक आदेश मंगळवार, ३ नोव्हेंबरमध्ये जारी केले आहेत.
शासनाकडून नव्याने लॉकडाऊन कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवून सुधारित आदेशान्वये (Easing of Restrictions & Phasewise opening of lockdown. - MISSION BEGIN AGAIN) लागू केलेले निर्बंध, तसेच सुरू करण्यास मान्यता दिलेल्या बाबी यापुढे ही सुरू राहतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४च्या तरतुदीनुसार रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात दि. ३१ ऑक्टोबर, २०२० रोजी रात्री १२ वा. पासून ते ३० नोव्हेंबर रात्री १२वा.पर्यंत नव्याने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
या अधिसूचनेद्वारे दिलेल्या अथवा यानंतर वेळोवळी पारीत केल्या जाणाऱ्या आदेशानुसार प्रतिबंधित केलेली अथवा केली जाणारी कृत्ये करण्यास मनाई राहील, असेही आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे आहेत आदेश
हे आदेश पोलीस, आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
 

Web Title: Lockdown in Raigad district till November 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.