आगरदांडा : मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून दररोज हजारो पर्यटक ये-जा करत असतात. अचानक पुरातत्त्व खात्याने पूर्वसूचना अथवा लेखी पत्र न देता किल्लाच्या प्रवेशव्दाराला कुलूप लावल्याने हजारो पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले. पुरातत्त्व खात्याने पूर्वसूचना न दिल्याने पर्यटक आणि बोट व्यावसायिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.काही महिन्यांपूर्वीच पुरातत्त्व खात्याने जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे लोखंडी गेट तयार करून नवीन प्रवेशद्वार तयार केले आहे. २६ मे रोजी रविवार असल्याने असंख्य देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहावयास आले होते; परंतु बोट व्यावसायिक अथवा पर्यटकांना कोणतीही पूर्वसूचना न देता पुरातत्त्व खात्याने अचानक किल्ल्यास कुलूप लावल्याने बोटधारक व पर्यटकांची मात्र कोंडी झाली. याबाबत जंजिरा किल्ल्यावर बोट वाहतूक करणाऱ्या जंजिरा जलवाहतूक संस्थेने मुरुड तहसीलदार व मुरुड पोलीसठाणे येथे तक्रार अर्ज देऊन पुरातत्त्व खात्याचे सहाय्यक संवर्धन येलकर यांच्याबाबत तक्रार के ली. त्यांनी फोनसुद्धा बंद ठेवला असून हजारो पर्यटकांची घोर निराशा केली असून किल्ल्याला कुलूप लावण्याअगोदर किमान सर्वांना अथवा वर्तमानपत्रात तरी बातमी प्रसिद्ध करणे अनिवार्य होते, असे तक्रारीत म्हटले आहे.मे महिन्याच्या सुट्टीमुळे लोक मोठ्या हौशेने किल्ला पाहावयास येतात; परंतु गेटला कुलूप कोणतीही पूर्वसूचना न देता लावल्याने पर्यटकांसह, स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी जंजिरा पर्यटक संस्थेचे चेरमन इस्माईल आदमने, व्यवस्थापक नाझीम कादरी, तबरेज कारभारी, अखलाक आदमने, रिजवान कारभारी यांनी निवेदन तहसीलदार व पोलीसठाण्यात दिले आहे.पुरातत्त्व खात्याचे सुप्रिटंडन श्रीनिवास नेगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना किल्ल्यास कुलूप लावल्याची घटनाच माहीत नसल्याचे सांगितले. याबाबत आमच्या वेबसाइटवट तक्रार करा, आम्ही त्वरित दखल घेतो, असे आश्वासन दिले.>कु लूप का लावले?किल्ल्यास कुलूप का लावण्यात आले याचे कारण स्पष्ट झाले नाही. अशा प्रकारे कुलूप लावणाºया पुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप; हजारो पर्यटक निराश होऊन परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:13 AM