शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Lok sabha 2019 : राज्यभर आचारसंहिता भंगाच्या 717 तक्रारी, 294 तक्रारींवर कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:34 PM

सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे

अलिबाग - नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर राज्यभरातून 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. तर रायगडमधूनही 8 तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली आहे.

पोस्टर, बॅनर संदर्भातील सर्वाधिक तक्रारी

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. 36 तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे. तर 387 तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक 230 तक्रारी ह्या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रुपीकरण 44, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण 7, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप 22, मद्याचे वाटप 18, पैशाचे वाटप 38, पेड न्यूज41, धार्मिक किंवा सामाजिक भाषण 3, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक 5, निर्धारीत वेळेनंतर ध्वनीक्षेपकाचा वापर 5 तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत 19 तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

सर्वाधिक 133 तक्रारी ॲपच्या सहाय्याने सर्वाधिक 133 तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्या खालोखाल ठाणे 68, सोलापूर 61, मुंबई उपनगर 45 तर मुंबई शहर येथे 41 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात 36, अहमदनगर 35, अकोला 11,  अमरावती 11, औरंगाबाद 12,  बीड 8, भंडारा 2, बुलढाणा 13, चंद्रपूर3, धुळे 2, गडचिरोली 2, गोंदीया 3, हिंगोली 7, जळगाव 20, जालना 1, कोल्हापूर18, लातूर 11, नागपूर 30, नंदूरबार 2, नाशिक 22, उस्मानाबाद 8, पालघर 24,परभणी 7, रायगड 8, रत्नागिरी 4, सांगली 17, सातारा 11, सिंधुदूर्ग 19, वर्धा 14, वाशिम 6 तर यवतमाळ जिल्ह्यातून 2 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास 'सी व्हिजिल' ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ॲपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सी व्हिजिल मोबाईल ॲप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाईल ॲपवर तक्रार करता येते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदानonlineऑनलाइनPoliceपोलिस