शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Lok Sabha Election 2019: 'या' मतदारसंघात महिला ठरवणार खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:17 PM

८ लाख ३४ हजार ७६६ महिला; रायगडमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या अंतिम मतदार यादीनुसार रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या १६ लाख ३७ हजार ८३९ असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ३ हजार ७२ आहे. महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा ३१ हजार ६९४ ने अधिक म्हणजे ८ लाख ३४ हजार ७६६ आहे. परिणामी यंदाचा खासदार या मतदार संघातील महिला ठरवणार असे चित्र आहे.रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात १ लाख ४३ हजार ६५० पुरुष तर १ लाख ४५ हजार १२१ महिला मतदार आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात १ लाख २४ हजार ६९१ पुरुष तर १लाख २९ हजार ६९० महिला मतदार आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात १ लाख ४० हजार ८७९ पुरुष तर १ लाख ४१ हजार ५७२ महिला मतदार आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात १ लाख ३१ हजार ५२१ पुरुष तर १ लाख ४४ हजार ९०२ महिला मतदार आहेत.गुहागर विधानसभा मतदारसंघात १ लाख ११ हजार ८८९ पुरुष तर १ लाख २६ हजार ५३ महिला मतदार आहेत. केवळ पेण विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार संख्या महिला मतदारांपेक्षा अधिक असून येथे १ लाख ४७ हजार ४२८ महिला तर १ लाख ५० हजार ४४२ पुरुष मतदार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात २ हजार ६९३ मतदान केंदे्र राहाणार असून, त्यापैकी १ हजार ९३९ ग्रामीण तर ७५४ शहरी भागात राहाणार आहेत. २४ मतदान केंद्रे संवेदनशील असून तेथे विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raigadरायगड