मावळमध्ये आता एकच हवा; खासदार नवा हवा, महाविकास आघाडीची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 04:56 PM2024-05-06T16:56:50+5:302024-05-06T16:58:10+5:30
जनतेच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचेच नाव- संजोग वाघेरे-पाटील यांची ग्वाही.
मधुकर ठाकूर, उरण : मावळमध्ये आता एकच हवा, खासदार हवा नवा अशा उत्स्फूर्त घोषणांनी जासई येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार दौऱ्याला सोमवारी (६) सुरुवात झाली.
इंडिया आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आय, शेकापक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा उरण तालुक्याचा गावनिहाय प्रचार दौऱ्याचे सोमवार ६ व रविवार ७ आयोजित करण्यात आला आहे. या प्रचार दौऱ्याचे आयोजन उरण- पनवेल विधानसभा इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रचार दौऱ्याचा आरंभ जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या गावनिहाय प्रचार दौऱ्यात मावळमध्ये आता एकच हवा, खासदार हवा नवा अशा उत्स्फूर्त घोषणा देत प्रचाराला सुरुवात झाली.यावेळी दहा वर्षांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत जनतेला आश्वासनाशिवाय काही एक न देणाऱ्या गद्दारांना खरी शिवसेना कोणती हे जनताच दाखवून देईल.नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दिबांचे नाव देण्यात येणार जनतेच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.
सोमवारी जासई, एकटघर, रांजणपाडा, सुरूंगपाडा, धुतुम, चिरले, गावठाण, जांभूळपाडा, वेश्वी, दादरपाडा, दिघोडे, कंठवली, विंधणे, खालचापाडा,नवापाडा, धाकटीजुई, बोरखार, टाकी, मोठेभोम, चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, कोप्रोली, खोपटा आदी गावात गावनिहाय प्रचार दौरा सुरू करण्यात आला आहे.
या प्रचार दौऱ्यात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील,बबनदादा पाटील, माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, माजी जिल्हा प्रमुख व विद्यमान कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील,नरेश रहाळकर, विनोद म्हात्रे, कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, माजी अध्यक्ष आर.सी.घरत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शरद पवार गटाचे प्रशांत पाटील, भावना घाणेकर, मनोज भगत,शेकापचे प्रीतम म्हात्रे, संतोष घरत, रमाकांत म्हात्रे, सीमा घरत, माकपचे भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे, हेमलता पाटील, ॲड.विजय पाटील,तसेच तालुकास्तरावरील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले आहेत.