मोठे वेणगाव येथे रेशन दुकानदारांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:39 AM2017-08-08T06:39:22+5:302017-08-08T06:39:22+5:30

जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला आधार राहिला आहे तो रेशन दुकानाचा, मात्र रेशन दुकानावर जे धान्य मिळत आहे त्यामध्ये सुध्दा दुकानदार अफरातफर करत आहेत.

 Looted by ration shopkeepers at large Vengaon | मोठे वेणगाव येथे रेशन दुकानदारांकडून लूट

मोठे वेणगाव येथे रेशन दुकानदारांकडून लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला आधार राहिला आहे तो रेशन दुकानाचा, मात्र रेशन दुकानावर जे धान्य मिळत आहे त्यामध्ये सुध्दा दुकानदार अफरातफर करत आहेत. रेशन दुकानदार मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याची तक्र ार लाभार्थी करत आहेत तरी प्रशासन गप्प आहे. या दुकानदारांवर कारवाई करावी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश सावंत यांनी तहसील कार्यालयात टाकलेल्या माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली आहे. पुरवठा निरीक्षक अधिकाºयांनी दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. तालुक्यातील एपीएल व बीपीएल शिधापत्रिका धारकांना कोणत्याही प्रकारचे धान्य दिले जात नाही. शासन निर्णय १७ डिसेंबर २०१३ अन्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत तत्कालीन लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थी अंत्योदय गटात समावेश करण्यात आला आहे, अशा सर्व लाभार्थींना शासनाच्या प्रचलित नियमानुसार प्रतिमाह २५ किलो तांदूळ व १० किलो गहू रास्त भाव धान्य दुकादारांमार्फत वितरीत केले जातात.
लाभ घेत असलेल्या एपीएल (केशरी) लाभार्थींसाठी ग्रामीण भागात कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ४४ हजारपर्यंत तर शहरी भागात कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजारपर्यंत असलेल्या लाभार्थ्यांचा प्राधान्य गटात समावेश झाला आहे. अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार प्रतिमाह प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ व २ किलो गहू रास्त धान्य दुकानामार्फत वितरीत केले जाते. ज्या शिधापत्रिकाधारकाकडे १ किंवा २ गॅस कनेक्शन आहे अशा कोणत्याच शिधापत्रिकाधारकास केरोसीन देण्याची तरतूद नाही रास्त भाव धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांस धान्य किंवा केरोसीन दिल्यानंतर त्यास पावती देणे बंधनकारक आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात दिली आहे.

१कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे नंदकुमार मोरे हे रेशन दुकान चालवतात तर जिजामाता महिला बचत गटाला रॉकेलचा परवाना दिला आहे ते दुकान भगवान पालकर चालवतात. हे दोन्ही दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात केली आहे.
२ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आमच्या गावात असलेले रेशन दुकानदार हे शासनाकडून येणारे धान्य शासनाच्या नियमावलीत न देता कमी प्रमाणात देत आहे. अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थींना शासनाच्या प्रचलित नियमानुसार प्रतिमहा २५ किलो तांदूळ व १० किलो गहू रास्त धान्य दुकानदारांमार्फत वितरीत करावयाचे आहे. मात्र दुकानदार १५ किलो तांदूळ व १० किलो गहू देत आहे.
३शिधापत्रिकेवर २५किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशी नोंद करत आहे तसेच रॉकेल दुकानदार सुध्दा १ लिटर रॉकेल देऊन त्यापेक्षा जास्त लिटरची नोंद शिधापत्रिकेच्या स्लिपवर करत आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना याबाबतची पावती देण्यात येत नाही. याबाबत या दुकानदारांना जाब विचारला तर ते अपशब्द वापरतात. तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलतात.
४याबाबतचे निवेदन लाभार्थींनी तहसील कार्यालयात दिले आहे. आमच्या आदिवासीबाबत होणाºया फसवणुकीची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title:  Looted by ration shopkeepers at large Vengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.