शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोठे वेणगाव येथे रेशन दुकानदारांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:39 AM

जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला आधार राहिला आहे तो रेशन दुकानाचा, मात्र रेशन दुकानावर जे धान्य मिळत आहे त्यामध्ये सुध्दा दुकानदार अफरातफर करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला आधार राहिला आहे तो रेशन दुकानाचा, मात्र रेशन दुकानावर जे धान्य मिळत आहे त्यामध्ये सुध्दा दुकानदार अफरातफर करत आहेत. रेशन दुकानदार मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याची तक्र ार लाभार्थी करत आहेत तरी प्रशासन गप्प आहे. या दुकानदारांवर कारवाई करावी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे.शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश सावंत यांनी तहसील कार्यालयात टाकलेल्या माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली आहे. पुरवठा निरीक्षक अधिकाºयांनी दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. तालुक्यातील एपीएल व बीपीएल शिधापत्रिका धारकांना कोणत्याही प्रकारचे धान्य दिले जात नाही. शासन निर्णय १७ डिसेंबर २०१३ अन्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत तत्कालीन लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थी अंत्योदय गटात समावेश करण्यात आला आहे, अशा सर्व लाभार्थींना शासनाच्या प्रचलित नियमानुसार प्रतिमाह २५ किलो तांदूळ व १० किलो गहू रास्त भाव धान्य दुकादारांमार्फत वितरीत केले जातात.लाभ घेत असलेल्या एपीएल (केशरी) लाभार्थींसाठी ग्रामीण भागात कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ४४ हजारपर्यंत तर शहरी भागात कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजारपर्यंत असलेल्या लाभार्थ्यांचा प्राधान्य गटात समावेश झाला आहे. अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार प्रतिमाह प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ व २ किलो गहू रास्त धान्य दुकानामार्फत वितरीत केले जाते. ज्या शिधापत्रिकाधारकाकडे १ किंवा २ गॅस कनेक्शन आहे अशा कोणत्याच शिधापत्रिकाधारकास केरोसीन देण्याची तरतूद नाही रास्त भाव धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांस धान्य किंवा केरोसीन दिल्यानंतर त्यास पावती देणे बंधनकारक आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात दिली आहे.१कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे नंदकुमार मोरे हे रेशन दुकान चालवतात तर जिजामाता महिला बचत गटाला रॉकेलचा परवाना दिला आहे ते दुकान भगवान पालकर चालवतात. हे दोन्ही दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात केली आहे.२ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आमच्या गावात असलेले रेशन दुकानदार हे शासनाकडून येणारे धान्य शासनाच्या नियमावलीत न देता कमी प्रमाणात देत आहे. अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थींना शासनाच्या प्रचलित नियमानुसार प्रतिमहा २५ किलो तांदूळ व १० किलो गहू रास्त धान्य दुकानदारांमार्फत वितरीत करावयाचे आहे. मात्र दुकानदार १५ किलो तांदूळ व १० किलो गहू देत आहे.३शिधापत्रिकेवर २५किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशी नोंद करत आहे तसेच रॉकेल दुकानदार सुध्दा १ लिटर रॉकेल देऊन त्यापेक्षा जास्त लिटरची नोंद शिधापत्रिकेच्या स्लिपवर करत आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना याबाबतची पावती देण्यात येत नाही. याबाबत या दुकानदारांना जाब विचारला तर ते अपशब्द वापरतात. तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलतात.४याबाबतचे निवेदन लाभार्थींनी तहसील कार्यालयात दिले आहे. आमच्या आदिवासीबाबत होणाºया फसवणुकीची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.