मधुकर ठाकूर
उरण: ज्याच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा सागर मुंबईत लोटतो. त्या लालबागच्या राजाचे दर्शन यंदा चिरनेरकरांना अकरा दिवस होणार आहे. चिरनेर कातळपाडा येथील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सार्वजनिक साखर चौथीचा गणेशोत्सव साजरा होत असून, यंदा या मंडळातर्फे लालबागच्या राजाची प्रतिकृती अकरा दिवसांसाठी विराजमान करण्यात आली आहे. लालबागच्या राजाची ही गणेशमूर्ती दहा फूट उंचीची असून, या मूर्तीच्या रंगसंगतीचे उत्कृष्ट काम मूर्तिकार नरेश हातनोलकर, जितेश हातनोलकर यांनी केले आहे. दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून वेग वेगळ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.
मंडळाचे हे सोळावे वर्ष असून, राजन वशेणीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश वशेणीकर, आकाश ठाकूर, राधाबाई वाणी, विजय वशेणीकर, रोहण वशेणीकर, मयूर वशेणीकर, मयूर म्हात्रे, प्रसाद म्हात्रे, जयेश पाटील, अभिजीत केणी, रत्नाकर वशेणीकर, स्वप्निल वशेणीकर, जितेंद्र वशेणीकर, नयन केणी, सुरज वशेणीकर,ओमकार वाणी, अजय वशेणीकर, परेश वशेणीकर प्रकाश वशेणीकर, गौरव वशेणीकर, मधुकर वशेणीकर, साहिल वशेणीकर, अनुप केणी, जितेश हातनोलकर, आशिष केणी, मोहील वशेणीकर, स्वप्निल पाटील, योगेश भोईर, प्रणिश वशेणीकर, विघ्नेश वशेणीकर, साईराज वशेणीकर, तसेच मंडळाचे अन्य शुभचिंतक कार्यरत आहेत. सजावट आणि भव्य मिरवणूक तसेच मिरवणुकीत होणारी फुलांची उधळण हे या मंडळाचे दरवर्षीचे आकर्षण असते.
दरम्यान चिरनेर या इतिहास प्रसिद्ध व अध्यात्मिकतेचा वारसा लाभलेल्या गावात, अंकुश परदेशी मित्र मंडळ, श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, गावदेवी गणेश मित्र मंडळ व महिला मंडळ, श्री महागणपती मित्र मंडळ, श्री गणेश मंडळ, गोरोबाकाका गणेश मंडळ, नवतरुण गणेश मंडळ तसेच अन्य गणेश मंडळांच्या व घरगुती गणेश उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या भक्तीमय वातावरणात अडीच दिवस, पाच दिवस आणि अकरा दिवसांसाठी गणेशोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.