- जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा ७ सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ हजार ४५२ मिमी अधिक पर्जन्यमान झाले आहे. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७३४ मिमी झालेल्या विक्रमी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत एकूण ३३ हजार ३६५ मिमी पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत तब्बल २९ हजार ३६९ मिमी अधिक पाऊस होऊन ६२ हजार ७३४ मिमीवर पोहोचला आहे. तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सप्टेंबरअखेर १९९ टक्के झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झालेल्या या पावसाने जलशिवार योजनेस मोठी साथ दिली असली तरी सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यात एकूण ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुरात वाहून गेलेले ४०, दरड कोसळून मृत्युमुखी पडलेले एक आणि इतर आपत्तींमुळे ३७ मृत्यू आहेत. इतर आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या ३७ जणांमध्ये १७ वाहन अपघात, ३ तळ्याच्या पाण्यात बुडून, एक ट्रेकिंग करीत असता, एक अंगावर दगड पडून, ८ पाण्यात बुडून, एक अंगावर भिंत पडून, एक समुद्राच्या भोवऱ्यात, २ सोलनपाडा धरणात बुडून, २ विजेचा धक्का लागून तर एक झाडाची फांदी अंगावर पडून मृत झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७८ जणांपैकी ३८ जणांना नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रत्यक्षात पात्र ३८पैकी ३६ मृतांच्या वारसांना एकूण १ कोटी ४४ लाखांची आर्थिक मदत रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.६४ पाळीव जनावरे मृत्युमुखीजिल्ह्यातील ६४ पाळीव जनावरे अतिवृष्टीत मृत्युमूखी पडली असून, त्यांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाकडून २ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई आतापर्यंत देण्यात आली आहे. याशिवाय काही पंचनाम्यांवर अद्याप निर्णय अपेक्षित आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात नैसर्गिक आपत्तीतील मृत्यू नाही. त्यामुळे नुकसानभरपाईच्या शासन निर्णयाच्या चौकटीत बसत नसल्याने या घटनेतील मृतांचा समावेश नैसर्गिक आपत्ती मृत्यूमध्ये नाही.- यंदाच्या विक्रमी अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील १ हजार ४०३ घरांना बसला आहे. यामध्ये ३३ घरे पूर्णपणे कोसळली, ३७२ घरांचे अंशत: नुकसान झाले, ८४६ कच्ची घरे अंशत: पडली, ३३ घरांची मोठी पडझड झाली; तर ११९ गुरांचे गोठे बाधित झाले आहेत. दरम्यान, १ हजार ४०३ अतिवृष्टीबाधित घरांपैकी ८८३ घरांतील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने ६ लाख ५३ हजार १८० रुपये एकूण नुकसानभरपाई दिली आहे.
पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान
By admin | Published: October 09, 2016 2:56 AM