पावसामुळे पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:10 AM2019-10-22T00:10:50+5:302019-10-22T00:10:55+5:30
तालुक्यात या आठवड्यात परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते.
म्हसळा : तालुक्यात या आठवड्यात परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. कोकणातील कापणीला आलेले भाताचे पीक मोठ्या प्रमाणात कोलमडून पडले होते. संभाव्य पावसामुळे आणखी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकºयांच्या तोंडी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर रानडुकरे, अन्य श्वापद शेतकºयांना त्रास देत असून, पिकाचे नुकसान करत आहेत.
कोकणातील भातशेती आडवी झाली असून, भात उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकºयांनी परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतातील उभ्या पिकाचे काढणीचे नियोजन करावे. तसेच ज्या शेतकºयांनी पिके काढली असतील त्यांनी ती पावसापासून सुरक्षित ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदा अनेक वर्षांनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे आठवड्यात पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी भातशेती पावसामुळे शेतकºयांनी केलेली मेहनत वाया जाणार आहे. तालुक्यात भातशेती प्रमाणेच नाचणी, वरी, काळे तीळ, तूर, चवळी, उडीद अशी पिके आज जमीनदोस्त झाली आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.