शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: ‘निसर्ग’पुढे सारे नमले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:00 AM

श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

- संतोष सापतेमहाराष्ट्राच्या इतर प्रांतांच्या तुलनेत कोकणाची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. एका ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अवघ्या सहा तासांत सर्वसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आणि भविष्य यांचा अक्षरश: चुराडा केला. ३ जून २०२० पूर्वीचा व सद्य:स्थितीतील रायगड जिल्हा यात प्रचंड तफावत पडली आहे. ताशी १२० चा वेगवान वारा व जोरदार पाऊस यामुळे नारळ, सुपारी, केळी व आंबा या पिकांना जमीनदोस्त केले.श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यातच, ‘निसर्ग’ चक्रीवादळाने शेतीची अगणित व कधीही भरून न येणारी हानी केली आहे. आज सर्वसामान्य माणसासमोर जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनवृद्धीसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असलेल्या व्यक्तीला प्रतिवर्र्ष नारळ, सुपारी, केळी व फणस याद्वारे साधारणत: ६० हजारांच्या आसपास उत्पन्न मिळते. मात्र, आगामी आठ वर्षांसाठी या उत्पन्नास शेतकरी मुकेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आंब्यासारखे डेरेदार अनेक पिढीचे साक्ष देणारे वृक्ष अस्तित्वासाठी चक्रीवादळात झुंजताना दिसले. आता आंबा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी त्याला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने दिलेले १०० कोटींचे आर्थिक पॅकेज चक्रीवादळग्रस्त लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, त्या मदतीतून वादळग्रस्त लोकांच्या जीवनाला नवीन दिशा व स्फूर्ती देणे प्रथमदर्शनी तरी अशक्य वाटत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, मुरूड, अलिबाग या तालुक्यांतील जनतेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. रायगड प्रशासनाने केलेल्या योग्य आपत्तीपूर्व नियोजनामुळे सुदैवाने मोठ्या स्वरूपातील जीवितहानी टळली. त्याबद्दल, प्रशासनाचे कौतुक करणे योग्य ठरेल.आपत्तीपूर्व श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, भरडखोल, दिघी व श्रीवर्धन शहरांतील जीवना कोळीवाडा या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र, मोबाइलसेवा, इंटरनेट यास पर्याय शोधण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली. वादळामुळे महावितरणच्या सर्व वीजखांबांची वाताहत झाली. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युतपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला.श्रीवर्धनमध्ये चक्रीवादळामुळे घरावरची कौले, पत्रे, घराच्या भिंती आणि असंख्य वृक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रायगड प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुक्यातील जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला वादळाने पूर्णत: जेरीस आणले आहे. सर्वसामान्य लोकांनी शासनाची मदत येण्यापूर्वीच आपल्या घराच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. त्यात अनेक दुकानदारांनी वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने मालाची विक्री केली. मात्र, पावसाळा डोक्यावर आला असताना सर्वसामान्य जनतेने मिळेल त्या किमतीत घरबांधणीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आहे.श्रीवर्धन शहरात जवळपास २१० सुपारी व नारळाच्या वाड्या होत्या. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार, मारळ, बागमांडला, नागळोली अशा अनेक गावांत नारळ, सुपारीचे पीक घेतले जात होते. आजमितीस हे सारे पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यात पावसाळा दारात उभा ठाकला असताना या संकटातून कोकणवासीय सावरलेले नाहीत, तेव्हा शेतीचा हंगाम किती यशस्वी होणार, लागवड किती होणार, हा मोठा प्रश्न आहे.पारंपरिक पद्धतीने शेती करणाºया येथील शेतकऱ्यांना योग्य भाव व सवलतीत बियाणे व साहित्य आगामी कालावधीसाठी देणे गरजेचे आहे. कोकणातील शेती ही हेक्टरात नसून गुंठ्यांत आहे. एका सातबाºयावर चारचार व्यक्तींची नावे आहेत. सरकारने मदत करताना किंवा सवलत देताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.कोळी समाजाची अवस्था बिकटरायगड जिल्ह्यात कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. चक्रीवादळात अनेकांच्या बोटी फुटल्या, नष्ट झाल्या. सरकारने कोळी समाजाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीसाठी अभ्यासपूर्ण व निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे.