‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमला रोहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:22 AM2017-08-16T01:22:51+5:302017-08-16T01:22:58+5:30
रोह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
रोहा : रोह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून गणवेशातील विद्यार्थ्यांसह एन.सी.सी. व आर.एस. पी.च्या कँडेट्सनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत संचलन केले. शहरात ठिकठिकाणी देशभक्तीपर गीत लावून अतिशय उत्साहाने हा दिवस साजरा करण्यात आला.
रोहा नगरपालिकेच्या डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहाच्या प्रांगणात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर बाजीप्रभू देशपांडे क्रीडांगण हनुमान टेकडी येथे नगरपालिकेतर्फे उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्र म रोहा तहसील कार्यालय येथे संपन्न झाला. या वेळी प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी संचलन व मानवंदना दिली. याप्रसंगी तहसीलदार सुरेश काशिद, नायब तहसीलदार दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर, शिंदे सर लालताप्रसाद कुशवाह, संजय कोणकर, जितेंद्र जोशी आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित
होते.
सोमवार, १४ आॅगस्टच्या रात्री तरुण कार्यकर्ते नीलेश शिर्के, राजेश काफरे, हर्षद साळवी आदी तरुण मंडळींनी शहरात मशाल फेरी काढून स्वातंत्र्य दिनाचे स्वागत केले.
रोह्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण
रोहा : रोहा न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश सुभाष फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र दिनाचा ७०वा वर्धापन दिन साजरा केला. या वेळी मान्यवर, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते. रोहा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर या वेळी सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
धाटाव येथील परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूलमध्ये माजी सरपंच विजयराव मोरे तर यशवंत धाटाव ग्रामपंचायत धाटाव कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच विनोद पाशीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रा. पं.चे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व तरु ण, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या प्रांगणात अध्यक्ष उस्मान रोहेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रोहा पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी यांनी ध्वजारोहण केले.