माणगावचे रस्ते दोन तासांत गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:10 AM2017-07-30T02:10:40+5:302017-07-30T02:10:44+5:30
माणगाव शहरातील महत्त्वाच्या कचेरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून दगड, चिखल, मातीतून वाहन चालविणे तर
माणगाव : माणगाव शहरातील महत्त्वाच्या कचेरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून दगड, चिखल, मातीतून वाहन चालविणे तर दूरच, पण पायी चालणेही कठीण झाले आहे.
माणगाव शहरातील महत्त्वाच्या कचेरी रस्त्यावर प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे, डी.वाय.एस.पी. कार्यालय, तहसील, पंचायत समिती, पाटबंधारे, पाणीपुरवठा अशी महत्त्वाची कार्यालये असून याच मार्गावर अशोक साबळे विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, श्रद्धा इंग्लिश माध्यम शाळा, शिपूरकर शाळा असून या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, तसेच तालुक्यातील विविध कामांसाठी आलेले नागरिक ये-जा करतात.
रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून रस्त्यावरून जाताना पादचाºयांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडाले की वाहन चालक व पादचारी यांच्यात शाब्दिक वाद होत आहेत. माणगाव सुधार कृती समितीने या रस्त्यावर नगरपंचायतीला वेळोवेळी निवेदन देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे माजी मंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य आ. सुनील तटकरे यांनी जुने माणगावात होणारा दूषित पाणीपुरवठा व कचेरी रस्त्याबाबत नगरपंचायतीमध्ये बैठक घेवून तातडीने लक्ष घालण्याची सूचना केली होती. मात्र नगरपंचायतीने केलेले काँक्रीटचे रस्ते पावसामुळे अवघ्या दोन तासांत वाहून गेले आहेत.