कामोठ्यात माथेफिरूने 43 गाड्या पेटवल्या
By वैभव गायकर | Published: November 28, 2022 08:53 PM2022-11-28T20:53:47+5:302022-11-28T20:53:54+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
पनवेल:कामोठे मधील मानसरोवर रेल्वे स्थानका बाहेरील पार्कींग केलेल्या तब्बल 43 दूचाकी माथेफिरूने पेटवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पनवेल परिसरात अशाप्रकारची घटना प्रथमच घडली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या आगीची माहिती मिळाल्यानंतर सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.अन्यथा या आगीच्या भक्षस्थानी आणखी गाड्या आल्या असत्या.रेल्वे स्थानकाच्या शेजारी प्लॅटफॉर्म बाहेरील पार्किंग मध्ये होत्या.रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी सुरु असुन लवकरच या घटनेतील आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.सायंकाळी 7 च्या सुमारास हि घटना घडली आहे.कामानिमित्त मुंबईला अथवा उपनगरात जाणारे नोकरदार याठिकाणी आपली वाहने पार्क करीत असतात.आग लागली पेक्षा आग लावल्याने हि दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
अधिकृत अनधिकृत पार्किंगच्या वादातून दुर्घटना ?
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर अधिकृत पार्किंग व्यवस्था आहे.जळालेल्या गाड्या नो पार्किंगमध्ये असल्याचे समजते.मात्र नेमक्या नो पार्किंग मधील गाडयांना आग कशी काय लागली ?हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.