अरुण जंगम
म्हसळा : मेंदडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नाइलाजाने गोरगरीब रु ग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार करून घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे रुग्णांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. दुर्गम, डोंगराळ भागातून या ठिकाणी ग्रामस्थ उपचार घेण्यासाठी येतात; परंतु या आरोग्य केंद्राला समस्यांनी ग्रासल्याने रुग्णांची निराशा होते. या भागातील गोरगरीब जनतेसाठी १९९०मध्ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. सुरुवातीची काही वर्षे येथील जनतेला प्रामाणिकपणे सेवा मिळत होती. मात्र, काही वर्षांनंतर या ठिकाणी नव्याने शिकाऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सुरुवात झाली व त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडून असलेल्या गावांमधील नागरिकांची कुचंबणा होऊ लागल्याने नाइलाजास्तव त्यांना खासगी दवाखान्यांची पायवाट पाहावी लागली. मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रास जवळपास खरसई उपकेंद्र पाण्याअभावी बंद असल्याने खरसई उपकेंद्रास जोडलेली तोंडसुरे, वरवठणे, बनोटी ही गावे आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी नसले किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या विभागातील गोरगरीब जनतेस खासगी दवाखान्यात जावे लागते. या परिसरातील गोरगरीब गरजू रु ग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे.हे आरोग्य केंद्र रुग्णांना सोयी-सुविधा देण्यास नेहमीच अपुरे पडत आहे. आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी वैद्यकीय अधिकारीपद रिक्त तर कधी कर्मचाºयांची पदे अपूर्ण, अशा एक ना अनेक समस्यांनी म्हसळ्यातील मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.डॉक्टरांची होतेय ओढाताणच्साधारण एक वर्षापूर्वी येथील डॉक्टरांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या डॉक्टरांकडे पाभरे प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज असल्याने या दोन्हीही प्राथमिक आरोग्य केंद्राना त्यांना भेट द्यावी लागते. याशिवाय मेंदडी व पाभरे हे जवळपास वीस किलोमीटरचे अंतर असल्याने आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाही आठवड्यातील काही दिवसच भेट देऊन उर्वरित काही दिवस मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावे लागत आहेत. त्यामुळे आता रु ग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने रु ग्णांना खासगी रु ग्णालयात उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करावी, तसेच इतर रिक्त पदेही भरावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.येथील कायमस्वरूपी डॉक्टरांची बदली झाल्याने त्यांच्या जागी पाभरे येथील डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली होती; परंतु या डॉक्टरांकडे कायमस्वरूपी पाभरे प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज असल्याने तेही कायम मेंदडी विभागास वेळ देऊ शकत नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल.- सूरज तडवी, तालुका वैद्यकीयअधिकारी, म्हसळामेंदडी विभागातील या प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास १५हजार लोकवस्तीची विविध गावे जोडली असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाºयांची नेमणुक करावी जेणेकरून येथील गोरगरीब जनतेस या वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येईल.- नाझीम हसवारे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी