शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

पेणमध्ये माघी गणेशोत्सवाची धामधूम सुरू, उत्सव मंडपात सजावट 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 1:46 AM

Maghi Ganeshotsav : बाप्पांचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाने सारे वातावरण मंगलमय आणि मंत्रमुग्ध करुन टाकणारे असते. गतवर्षी भाद्रपदात बाप्पांची सेवा करण्याचा व उत्सवाचा आनंद अनुभवता आला नाही.

पेण :  माघी बाप्पांचे सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी आगमन होणार आहे. पेणमधील १८४ गावांपैकी खारेपाट विभागातील पश्चिमेकडील तब्बल ९२ गावांमध्ये गणरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील सार्वजनिक व हौसेचे घरगुती बाप्पा गणेश जयंतीच्या दिवशी येणार असल्याने संबंधित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व घरगुती गणेशासाठी मखर, आरास, विद्युत रोषणाई, मंडप सजावट यासाठी उत्साही वातावरणात लगबग सुरू झाली आहे. एकूणच हा उत्साही माहोल पाहता, बच्चे कंपनी व गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पेण ग्रामीण भागात बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंधेला हे चित्र पाहावयास मिळत आहे.बाप्पांचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाने सारे वातावरण मंगलमय आणि मंत्रमुग्ध करुन टाकणारे असते. गतवर्षी भाद्रपदात बाप्पांची सेवा करण्याचा व उत्सवाचा आनंद अनुभवता आला नाही. कोरोना संसर्गामुळे घरच्या घरी बाप्पांची मानसपूजा झाली. सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवळची जीवलग माणसे कोरोना महामारीला बळी पडत असताना भक्तीमय वातावरणाला अवकळा आली होती. खिन्न वातावरणामुळे हौसमौज करताच आली नव्हती. ही उणीव भरुन काढण्यासाठी आता माघी गणेशोत्सवाला सांस्कृतिक अधिष्ठान या उत्सवांच्या अनुषंगाने मिळणार आहे. भजनी मंडळे सिध्द झाली आहेत. गणेश मंदिरांची रंगरंगोटी झाली आहे. 

उत्सव मंडपात सजावट उत्सव मंडपात सजावट व विद्युत रोषणाईवर अखेरचा हात फिरवला जात असून, ज्या घरात बाप्पांचे आगमन होणार आहे, तेथील सारेजण सजावट करण्यात गुंतले आहेत. पेणमध्ये तब्बल ६००हून अधिक माघी गणरायांचे आगमन होणार आहे.

प्रत्येक गावातील सार्वजनिक व हौसेचे घरगुती बाप्पा गणेश जयंतीच्या दिवशी येणार असल्याने संबंधित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व घरगुती गणेशासाठी मखर, आरास, विद्युत रोषणाई, मंडप सजावट यासाठी उत्साही वातावरणात लगबग सुरू झाली आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवRaigadरायगड