नांदगाव/मुरुड : मुरुड शहरातील आझाद चौकातील ध्वजारोहण नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याच वेळी विविध शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते झाले. तहसील कार्यालयातील ध्वजारोहणाला अनेक पक्षांतील मान्यवर तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या वेळी तहसील कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मुरु ड तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष व माजी शिक्षक गोपाळ दवटे यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास पालकांच्या स्वाधीन करून योग्य कर्तव्य बजावणारे पोलीस उपनिरीक्षक संजय हेमाडे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. मुरुड तालुक्यातील शीघ्रे गावात राहणारे मुकेश मोहन नाक्ती हे भारतीय लष्करात कामगिरी बजावत असताना, गुजरात-राजस्थान सीमारेषेत तीन आंतकवाद्यांना कंठस्थान घालणारे शूर जवान, म्हणून त्यांचा विशेष सत्कार झाला. या वेळी सांस्कृतिक क्षेत्रात सिद्धेश लखमदे, हेमंत अडसूळ, अश्विनी जोशी, सानिका पाटील, वैष्णवी ठोसर, सनी खेडेकर, शिवम सिंह, अर्थव धोत्रे, समिधा रसाळ आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शेतकरी पुरस्कारप्राप्त रमेश भेर्ले, गजानन वारगे आदींचेही विशेष सत्कार झाला.>मुरुडमध्ये पोलीस संचलनाची मागणीतहसील कार्यालयातील अल्पोपाहार समारंभात मुरु ड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे यांनी, पूर्वी स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी पोलिसांचे संचलन व्हायचे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे संचलन बंद पडले आहे. हे संचलन पुन्हा सुरू व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. मुरु ड पोलिसांनी संचलन करावे अशी आग्रही मागणी केली. यावर उत्तर देताना पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी मुरु ड पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी आहे. संचलन करण्यासाठी किमान २५ पोलीस तरी आवश्यक आहेत. पोलीस संख्या कमी असल्याने संचलन करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
चांगले काम करणा-यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:19 AM