निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 11:51 PM2019-10-22T23:51:59+5:302019-10-22T23:52:13+5:30
महाराष्ट्र निवडणूक २०१९: मतदारांना प्रतीक्षा निकालाची; मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी चोख बंदोबस्त
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर आता प्रशासनाने निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष केंद्रित केले आहे. सात विधानसभा मतदारसंघातील त्या त्या ठिकाणी २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
पनवेल, पेण, कर्जत या विधानसभा मतदारसंघात १४ टेबलांची संख्या आणि प्रत्येकी २४ मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. पेण, अलिबाग प्रत्येकी २७, श्रीवर्धन मतदारसंघात २५ आणि महाड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २८ फेºया होणार आहेत.
सोमवारी मतदान पार पडल्यानंतर तब्बल ७८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्हा प्रशासनाने आता मतमोजणी करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा क्र ीडा संकुल नेहुली येथे मतमोजणी होणार आहे. १४ टेबल आणि २७ फेºया होणार आहेत. पनवेल के.ई.एस.इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालय पनवेल येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या २४ व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या २४ अशी आहे. कर्जत श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय किरवली-कर्जत येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या १४ व मतमोजणीच्या एकूण २४ फेºया होणार आहेत.
उरण रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा जासई येथे मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या १४ आहे. या ठिकाणी २४ फेºया होणार आहेत. पेण के.ई.एस.लिटील एंजल स्कूल झी गार्डन शेजारी, पेण येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या १४ आणि मतमोजणीच्या एकूण फेºयांची संख्या २७ अशी आहे. श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या १४ आणि मतमोजणीच्या एकूण २५ फेºया होणार आहेत. महाड विधानसभेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे मतमोजणी पार पडणार आहे. या ठिकाणी १४ टेबल मांडण्यात येणार आहेत, तर २८ फेºया होणार आहेत.
मतदान यंत्रणा सुरक्षेचे कडे
सातही विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ही मजमोजणी होणाºया ठिकाणीच स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूमजवळ सीआयएसएफचे ३२ जवान २४ तास तैनात राहणार आहेत. त्यानंतर दुसºया सुरक्षेच्या कड्यामध्ये एसआरएफएफचे १० जवान डोळ््यात तेल घालून रखवाली करणार आहेत.
तिसºया कड्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस पहारा देणार आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांच्या १२ तासांनी ड्युटी बदलणार आहेत. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळी स्ट्राँगरूम निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली उघडण्यात येणार आहेत.
पनवेल : मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन (मतपेटी) शहरातील व्ही के शाळेत ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्ट्राँगरूम तयार करून चोख पोलीस बंदोबस्तात मतपेटी ठेवण्यात आल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी ७ वाजता सर्व मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशिन बंदिस्त करून व्ही के शाळेतील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या. या वेळी रात्री ३ वाजेपर्यंत मतदान पेटी सिल करण्याचे काम सुरू होते. स्ट्राँगरूमला पोलिसांसह विशेष पोलीस बळाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात सीआयएसएफ जवान, सीआरपीएफ गार्ड, मुख्यालय कर्मचारी यामध्ये दहा कर्मचारी व २० पोलीस अधिकाºयांचाही समावेश आहे. स्ट्राँगरूम परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. स्ट्राँगरूमजवळ वायरलेस सेट ठेवण्यात आला आहे. जेणेकरून वरिष्ठ अधिकाºयांना प्रत्येक क्षणाची माहिती देता यावी. व्ही के शाळेमधील गेटही सिल करण्यात आलेला आहे.
गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या उपस्थितीत संबंधित गेटचे सिल काढून मतदान प्रक्रियेतील मतमोजणी अधिकाºयांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. या वेळी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाने मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे.
एक्झिट पोलमुळे चर्चेला उधाण
निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचार, बैठका, गाठीभेटींमध्ये गुंतलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सोमवारी मतदान पार पडल्यावर मोठा दिलासा मिळाला. गुरुवारी निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वच ठिकाणी युतीला स्पष्ट बहुमत दाखविण्यात आल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलला खोटे ठरवले आहे.
१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण २४ फेºया होणार आहेत. दर दोन तासांनी वरिष्ठांची गस्त पनवेलमधील व्ही के शाळेत चोख बंदोबस्त व्ही के शाळेतील स्ट्राँगरूमसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. प्रत्येक दोन तासाला सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक या स्ट्राँगरूम परिसराला भेट देऊन सुरक्षेची माहिती घेत असतात.
- रवींद्र गिड्डे, सहायक पोलीस आयुक्त, पनवेल