शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 11:18 PM

महाराष्ट्र निवडणूक २०१९: रायगड जिल्ह्याच्या आकडेवारीत ५५.३ टक्के नोंद; लोकसभेपेक्षाही एक टक्का घसरला

- वैभव गायकरपनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व मेट्रोपॉलिटन मतदारसंघ म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, जिल्ह्याच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत पनवेलमधील मतदानाची टक्केवारी ढासळली आहे. विशेष म्हणजे, लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी झालेल्या मतदानापेक्षाही हे मतदान एक टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकी वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघात ५५.३ टक्के मतदान झाले होते. तर आता विधानसभेसाठी केवळ ५४.१३ टक्के मतदान झाले आहे.

रायगड जिल्ह्यात १८८ पनवेल, १८९ कर्जत, १९० उरण, १९१ पेण, १९२ अलिबाग, १९३ श्रीवर्धन, १९४ महाड आदी मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघापैकी पनवेल मतदारसंघ सर्वात मोठा आहे. तब्बल पाच लाख ५७ एवढी मतदारसंख्या या मतदारसंघात आहे. पनवेल मतदारसंघ या वेळी मतदारांचा बहिष्कार व नोटा मोहिमेमुळे चांगलाच चर्चेत आला.

मतदारसंघातील रस्ते, पाणी आदी प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी ही मोहीम छेडली होती. विशेषत: सिडको नोडमधील मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पनवेल मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर व शेकापचे हरेश केणी यांच्यात थेट लढत आहे. वर्षभरापासून भाजपने मतदारसंघात कॅम्पेनिंग सुरू केले होते. प्रशांत ठाकूर यांचा दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची फौज पाहता सहजरीत्या मतदारांपर्यंत पोहोचणे त्यांना सहज शक्य झाले त्या तुलनेत शेकापचे हरेश केणी यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने सर्वच स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही.

पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये हरेश केणी नावाचे दोन उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष डमी उमेदवार हरेश केणी आणि शेकापचे हरेश केणी यांची किती मते विभाजन करतो, याबाबतही उत्सुकता आहे. पनवेल मतदारसंघाला लागून असलेल्या उरण मतदारसंघात मात्र जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान उरण मतदारसंघात झाले. उरणमध्ये ७४.३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील उरणची मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

विधानसभा निवडणुकीतील टक्के वारी

मतदारसंघ- एकूण मतदार- झालेले मतदान- टक्केवारी

१८८ पनवेल   ५,५७,३२४        ३,०१,७०३          ५४.१३ टक्के

१८९ कर्जत     २,८२,२४७       १,९९,८४५          ७०.८१ टक्के

१९० उरण       २,९४,१५१       २,१८,६११           ७४.३२ टक्के

१९१ पेण          ३,०१,८५७      २,१५,१७३          ७१.२८ टक्के

१९२ अलिबाग  २,९४,५८३     २,१३,९०४          ७२.६१ टक्के

१९३ श्रीवर्धन     २,५७,५३२    १,५६,६८२         ६०.८४ टक्के

१९४ महाड       २,८४,३४५    १,९०,४४५         ६६.९८ टक्के

एकूण ६५.८६ टक्के

नोटाबाबत उत्सुकता

पनवेल विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी नोटा मोहीम सुरू केली होती. सोशल मीडिया, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर नोटाचे मोठे बॅनर्स झळकत असल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, मतमोजणीच्या दिवशी नोटाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने किती मतदारांनी नोटा पर्याय निवडला, याबाबत उत्सुकता असणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान