अजय कदममाथेरान : येथील आरोग्य सुविधेविषयी राज्य सरकार जागरूक असून यापुढे दर १५ दिवसांनी माथेरानच्या जनतेसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावेळी महाबळेश्वरमध्ये राज्य शासन ज्याप्रमाणे आरोग्य व्यवस्था कॉर्पोरेट फंड उभा करून करीत आहे, तो पॅटर्न आरोग्य विभाग माथेरानमध्ये राबविणार असून महाआरोग्य शिबिरासाठी औषधे त्याच माध्यमातून देणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली. आरोग्य मंत्र्यांचा माथेरान दौरा माथेरानची आरोग्य व्यवस्था सुकर करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. माथेरानमधील नगरपालिका दवाखान्याचे राज्य सरकारच्या ग्रामीण रुग्णालयात निर्मिती करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आल्याची माहिती देखील आरोग्य मंत्र्यांनी दिली.माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या दवाखान्याची पाहणी करण्यासाठी आणि तेथील आरोग्य सुविधेविषयी माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत माथेरानला आले आहेत. त्यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह माथेरानमधील सरकारी दवाखान्याची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रांत अधिकारी दत्ता भडकवाड, शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, संघटक प्रवीण सकपाळ, तालुका तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्यासह माथेरान नगरपालिकेचे नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी,पालिका मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप, माथेरानमधील आरोग्य विभागाचे भास्कर अडांगळे आदी उपस्थितहोते.नगरपालिका रु ग्णालयाची पाहणी केल्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी माथेरानसाठी अनेक सुविधा उपलब्ध देत असल्याचे जाहीर केले.माथेरान नगरपालिकेच्या दवाखान्याचे राज्य सरकार ग्रामीणरुग्णालयात रूपांतर करीत असून त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा कालावधी मोठा असला तरी आजपासून राज्य सरकार माथेरानसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यात माथेरानमध्ये असलेले बंगलेधारक यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट फंड राज्य सरकारच्या माध्यमातून उभा केला जाईल.त्या निधीमधून दर १५ दिवसांनी एक महाआरोग्य शिबिर आयोजित केले जाईल, असे स्पष्ट केले.शिबिरात होणार मोफत औषधोपचार१महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया बुधवारी सर्व आजारांवरील विशेष तज्ज्ञ डॉक्टर हे माथेरानला येऊन लहान मुलांपासून गरोदर माता, वृद्ध यांची तपासणी करतील आणि आवश्यकतेनुसार त्यांना जिल्ह्यात किंवा मुंबई अशा ठिकाणी गरजेनुसार उपचार केले जातील.२त्या शिबिरात सर्व रु ग्णांना औषधोपचार हा मोफत दिला जाईल आणि त्यांची पुढील उपचारासाठी नेण्याची व्यवस्था शासन करील असे जाहीर केले. सर्व औषध साठा हा राज्य सरकार कॉर्पोरेट फंडमधून उभा करणार आहे. त्याचवेळी प्राथमिक तपासण्या करण्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी तत्काळ खरेदी करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांना दिले.३माथेरानमधील लोकांना आणि येथे येणाºया पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून महाबळेश्वरमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा राबवित आहे, तो पॅटर्न माथेरानमध्ये आरोग्य विभाग आणि राज्य सरकार यशस्वी करेल, अशी माहिती देखील आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. माथेरान पालिका रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश यादव, डॉ. उदय तांबे यांनी रु ग्णालयाची सध्याची स्थिती यांची माहिती दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.के . मोरे उपस्थित होते.माथेरान गिरीस्थान नगरपालिकेचा पुढाकारआरोग्य मंत्र्यांनी दोन दिवसाला एक असे विशेष तज्ज्ञ डॉक्टर शासन देणार आहे. त्या डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिले.माथेरानकरांना सुविधामाथेरान नगरपालिकेच्या दवाखान्याचे राज्य सरकार ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करीत असून त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. येथे सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
महाबळेश्वरचा आरोग्य सुविधा पॅटर्न राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:03 AM