Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:38 PM2020-08-26T23:38:23+5:302020-08-26T23:38:42+5:30

घरच उद्ध्वस्त झाल्याने निवाराच हरपला

Mahad Building Collapse: Losing a lifetime of capital; brings tears to accident victims | Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर

Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर

googlenewsNext

संदीप जाधव

महाड : येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत अनेक कुटुंबात जीवितहानी तर झालीच, शिवाय मेहनत करून साठविलेल्या पुंजीतून घेतलेले घरच उद्ध्वस्त झाले. केवळ अंगावरील कपड्यानिशी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी घरातील सर्व ऐवज सोडून बाहेर पडलेल्या अनेक कुटुंबांनी संपूर्ण आयुष्यभराची पुंजीच गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून आले. आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्याची काळजी वाटतेय, आमच्या मुलाबाळांची शिक्षणे कशी करायची? असे अनेक प्रश्न दुर्घटनाग्रस्तांनी प्रशासनासमोर मांडले.

या इमारतीत राहणाºया इरफान जोगीलकर यांना तर आपले दु:ख मांडताना अक्षरश: रडू कोसळले. इरफान यांची मिनीडोर रिक्षा आहे. तेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन. मात्र, या इमारतीखाली संपूर्ण मिनीडोर चिरडून तिचा चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न जोगीलकर यांना पडला आहे. त्यांचा एक मुलगा इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षात आहे. त्याच्या कॉलेजच्या फीसाठी पै-पै करून जमा केलेले ७० हजार रुपये घरातच जपून ठेवले होते. आता ते सारेच गेले. जोगीलकर यांच्याप्रमाणे या दुर्घटनेतील मुस्तुफा समद चाफेकर, इर्शाद अनवारे, नदीम बांगी, हसीम शेखनाग, अन्सारी, शौकत अलसुरकर, अयुब चिचकर, अख्तर पठाण, दाऊद हजवाने आदी कुटुंबेही याच संकटात सापडलेली आहेत. एका कुटुंबाने तर घराबरोबरच शंभरहून अधिक तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज गमावल्याचे सांगताना, त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

बचाव कार्यात एनडीआरएफसह साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणो आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, कोल्हापूरची व्हाइट आर्मी यांचा समावेश होता.

भाडेकरूंना मदत करा
बिरवाडी : महाडमधील तारिक गार्डन या इमारत दुर्घटनेत बाधित झालेल्या भाडेकरूंना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे बिरवाडी विभाग संपर्कप्रमुख येथील रहिवासी अख्तर पठाण यांनी केली आहे. शासन आणि फ्लॅटधारकांसाठी मदत जाहीर केली असली, तरी या इमारतींमधील फ्लॅटमध्ये असणाºया भाडेकरूंच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी.

गेल्या सहा वर्षांपासून तारिक गार्डन या इमारतीमध्ये अख्तर पठाण भाडेतत्त्वावर राहत होते. लॉकडाऊन असल्याने अख्तर पठाण त्यांच्या महाड तालुक्यातील कुसगाव येथील मूळगावी वास्तव्यास होते, तर त्यांची पत्नी व मुले ही मुंबईत असल्याने प्राण वाचले आहेत. मात्र, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.

बेघर कुटुंबांची आंबेडकर स्मारकात व्यवस्था : या दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या कुटुंबांची शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तात्पुरता निवाºयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे भोजनाचीही व्यवस्था महाड नगरपरिषद आणि सेवाभावी संस्थांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. बुधवारी सकाळी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आदी उपस्थित होते.

Web Title: Mahad Building Collapse: Losing a lifetime of capital; brings tears to accident victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.