शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:38 PM

घरच उद्ध्वस्त झाल्याने निवाराच हरपला

संदीप जाधव

महाड : येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत अनेक कुटुंबात जीवितहानी तर झालीच, शिवाय मेहनत करून साठविलेल्या पुंजीतून घेतलेले घरच उद्ध्वस्त झाले. केवळ अंगावरील कपड्यानिशी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी घरातील सर्व ऐवज सोडून बाहेर पडलेल्या अनेक कुटुंबांनी संपूर्ण आयुष्यभराची पुंजीच गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून आले. आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्याची काळजी वाटतेय, आमच्या मुलाबाळांची शिक्षणे कशी करायची? असे अनेक प्रश्न दुर्घटनाग्रस्तांनी प्रशासनासमोर मांडले.

या इमारतीत राहणाºया इरफान जोगीलकर यांना तर आपले दु:ख मांडताना अक्षरश: रडू कोसळले. इरफान यांची मिनीडोर रिक्षा आहे. तेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन. मात्र, या इमारतीखाली संपूर्ण मिनीडोर चिरडून तिचा चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न जोगीलकर यांना पडला आहे. त्यांचा एक मुलगा इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षात आहे. त्याच्या कॉलेजच्या फीसाठी पै-पै करून जमा केलेले ७० हजार रुपये घरातच जपून ठेवले होते. आता ते सारेच गेले. जोगीलकर यांच्याप्रमाणे या दुर्घटनेतील मुस्तुफा समद चाफेकर, इर्शाद अनवारे, नदीम बांगी, हसीम शेखनाग, अन्सारी, शौकत अलसुरकर, अयुब चिचकर, अख्तर पठाण, दाऊद हजवाने आदी कुटुंबेही याच संकटात सापडलेली आहेत. एका कुटुंबाने तर घराबरोबरच शंभरहून अधिक तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज गमावल्याचे सांगताना, त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

बचाव कार्यात एनडीआरएफसह साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणो आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, कोल्हापूरची व्हाइट आर्मी यांचा समावेश होता.भाडेकरूंना मदत कराबिरवाडी : महाडमधील तारिक गार्डन या इमारत दुर्घटनेत बाधित झालेल्या भाडेकरूंना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे बिरवाडी विभाग संपर्कप्रमुख येथील रहिवासी अख्तर पठाण यांनी केली आहे. शासन आणि फ्लॅटधारकांसाठी मदत जाहीर केली असली, तरी या इमारतींमधील फ्लॅटमध्ये असणाºया भाडेकरूंच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी.

गेल्या सहा वर्षांपासून तारिक गार्डन या इमारतीमध्ये अख्तर पठाण भाडेतत्त्वावर राहत होते. लॉकडाऊन असल्याने अख्तर पठाण त्यांच्या महाड तालुक्यातील कुसगाव येथील मूळगावी वास्तव्यास होते, तर त्यांची पत्नी व मुले ही मुंबईत असल्याने प्राण वाचले आहेत. मात्र, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.बेघर कुटुंबांची आंबेडकर स्मारकात व्यवस्था : या दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या कुटुंबांची शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तात्पुरता निवाºयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे भोजनाचीही व्यवस्था महाड नगरपरिषद आणि सेवाभावी संस्थांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. बुधवारी सकाळी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाRaigadरायगड