शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

Mahad Building Collapse: मृतांच्या वारसदारांना 5 लाख अन् जखमींना 50 हजारांची मदत देणार; विजय वडेट्टीवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 7:52 PM

विजय वडेट्टीवार यांनी आज महाड येथे तातडीने जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

रायगडरायगड जिल्ह्यातील महाड येथिल हापूस तलावाजवळ असलेल्या तारिक गार्डन नावाची इमारत सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली. ही माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळताच बचाव कार्यसाठी त्यांनी पुणे येथून एनडीआरच्या तीन तुकड्या तातडीने महाड येथे पाठविले. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या कडून घटनास्थळाची संपूर्ण माहिती घेतली. विजय वडेट्टीवार यांनी आज महाड येथे तातडीने जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आमदार भारत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती जगताप यांच्या सोबत चर्चा केली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्याच्या वारसदारांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या त्यांचा विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 5 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपयांची मदत विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली. या दुघटनेत किमान 22 जणांचे कुटुंबाची घरे उध्वस्त झालेली असल्याने त्यांना भरीव मदत मिळण्यासाठी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करणार असून त्यांना तातडीने भरीव मदत देण्याचे काम महा विकास आघाडी करणार आहे अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली. या इमारतीमध्ये 41 कुटुंब राहत होते. त्यातील 18 जणांना बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आणखी काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे.

पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली.

पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRaigadरायगडBuilding Collapseइमारत दुर्घटना