Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार! प्रशासनानं घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:27 PM2021-07-31T18:27:48+5:302021-07-31T18:28:19+5:30

Mahad Flood: महाड या पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Mahad Flood black market for drinking water administration took action | Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार! प्रशासनानं घेतली दखल

Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार! प्रशासनानं घेतली दखल

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

रायगड ः महाड या पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी विक्रेते पिण्याच्या पाण्याची चढया दराने विक्री करीत आहेत. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उप नियंत्रक वैधमापनशास्त्र विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे.महाडमध्ये आलेल्या महापुरामुळे सध्या तेथील पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी चढ्या दराने पाण्याची विक्री  केली जात असल्याने सामन्य नागरिक चांगलाच त्रस्त झाला आहे. त्याला दिलासा द्यावा, पाण्याचा काळा बाजार करणाऱ्यां विराेधात कडक कारवाई करावी अशी मागणी अलिबागमधील पत्रकारांनी केली हाेती. त्यानुसार आता भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत.

साेमवार ते शुक्रवार सदरची पथक महाड आणि माणगाव या ठिकाणी तपासणी करणार आहेत. तसेच महाड आणि माणगाव येथील वैधमापनशास्त्र विभागानेही आपापल्या कार्यक्षेत्रात दरराेज तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे उप नियंत्रक वैद्यमापनशास्त्र विभागाचे राम राठाेड यांनी सांगितले.दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या निर्णायामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर चांगलाच अंकुश बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Web Title: Mahad Flood black market for drinking water administration took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.