"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 08:42 PM2024-11-13T20:42:12+5:302024-11-13T20:46:05+5:30

Mahendra Thorave : कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्याविरोधात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Disinformation about EVMs by Mahendra Thorave supportes in Karjat Assembly Constituency | "पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार

"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार

Karjat Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काही ठिकाणी आचारसंहितेचा भंग केल्याचाही प्रकार समोर आला आहे. कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने ईव्हीएमबाबत अपप्रचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्याने ईव्हीएमची बाकीची बटणे खराब असून फक्त पहिल्या क्रमांकाचे बटण दावण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. या सगळ्या प्रकाराचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाने आता या सगळ्या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमबाबत अपप्रचार केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. डमी ईव्हीएम मशिन दाखवून पहिल्या क्रमांकाचे बटन दावा असं आवाहन एक कार्यकर्ता करताना दिसत आहे. व्हिडीओतील व्यक्ती ईव्हीएमची इतर बटणे खराब असल्याचेही सांगत आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, ठाकरे गटाने याप्रकरणी संभ्रम पसरवणाऱ्या अय्युब तिवलेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अय्युब तिवले हा महेंद्र थोरवे यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटलं जात आहे.

व्हिडीओनुसार, महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात डमी ईव्हीएम घेवून मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. ईव्हीएमचे केवळ १ नंबरचे बटण सुरू असून बाकीची बटणं बंद आहेत. त्यामुळे फक्त एक नंबरचं बटण दाबा. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये हा सगळा प्रचार केला जात असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या सगळ्या प्रकाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

महेंद्र थोरवेंची अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याला धमकी

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे हे अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याला धमकावत असल्याचाही व्हिडीओ समोर आला होता.  कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची कर्जतच्या कडाव बाजारपेठेत प्रचार रॅली निघाली होती. यावेळी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करणाऱ्या ७५ वर्षीय मनोहर पाटील यांनी महेंद्र थोरवे यांना हात जोडत मला धमकी देऊ नका असं म्हटलं. त्यानंतर थोरवे यांनी या कार्यकर्त्याला धमकी दिली. प्रत्येकाने आपापल्या उमेदवाराचा प्रचार करावा असे मनोहर पाटील यांनी आमदार थोरवे यांना म्हटलं होतं. त्यानंतर थोरवे यांनी पुन्हा धमकी देण्यास सुरूवात केली आणि तुला पुराच करतो, तुला पुरा नाही केला तर नाव नाही असं म्हटलं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Disinformation about EVMs by Mahendra Thorave supportes in Karjat Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.