राजकीय पक्ष निवडणुक आयोगाच्या एक हात पुढे; व्होटिंग स्लिप राजकीय पक्षाच्या माध्यमातून घरपोच

By वैभव गायकर | Published: November 18, 2024 09:42 PM2024-11-18T21:42:38+5:302024-11-18T21:42:38+5:30

निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्ष एक हात पुढे असल्याचे दिसून येत आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 political parties are step ahead of the election commission | राजकीय पक्ष निवडणुक आयोगाच्या एक हात पुढे; व्होटिंग स्लिप राजकीय पक्षाच्या माध्यमातून घरपोच

राजकीय पक्ष निवडणुक आयोगाच्या एक हात पुढे; व्होटिंग स्लिप राजकीय पक्षाच्या माध्यमातून घरपोच

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेलमतदारांपर्यंत जनजागृती करण्यासाठी यावर्षी निवडणूक आयोगामार्फत जनजागृती केली जाते.स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवुन मतदारांना मतदान करण्याचे अवाहन केले जात असताना.मतदानाकरिता आवश्यक असलेल्या वोटिंग स्लिप अद्याप मतदारांपर्यंत पोहचलेल्या नाहीत.याउलट राजकीय पक्षानी स्वतःचे नाव, चिन्ह असलेल्या  वोटिंग स्लिप मतदारापर्यंत घरपोच पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.यामुळे निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्ष एक हात पुढे असल्याचे दिसून येत आहे.

पनवेल मध्ये 6 लाख 52 हजार मतदार आहेत.जवळपास 2676 मतदान केंद्रावर हे मतदार मतदान करणार आहेत.मात्र मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी आवश्यक असलेली वोटिंग स्लिप अद्याप निवडणूक आयोगाच्या वतीने वाटप करण्यात आली नसल्याचे अनेक मतदार सांगत आहेत.वास्तविक पाहता निवडणूक आयोगामार्फत दिली जाणारी स्लिपच अधिकृत समजली जाते.मात्र निवडणूक आयोगामार्फत नेमलेल्या बीएलवो मार्फत अद्याप मतदारांपर्यंत वोटिंग स्लिप पोहचलेल्या नाहीत.निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत असताना वोटिंग स्लिप वाटपात उदासीनता दिसून येत आहे.मागील महिना भरापासून तयारीला लागलेले निवडणूक आयोग करते तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जनजागृतीवर भर देणारे निवडणून आयोग प्रत्यक्ष कामात मात्र कमी पडत आहेत.खारघर शहर ग्रामीण भागात मतदानाच्या दोन दिवस आगोदर वोटिंग स्लिप पोहचले नव्हते.उमेदवारांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारांपर्यंत स्लिप पोहचविण्याची धावपळ सुरु आहे.प्रचार संपलेला असताना सोमवारी रात्री उशिरा पर्यंत उमेवारांचे नाव,चिन्ह आणि फोटो असलेल्या चिठ्ठ्या वाटप केल्या जात होत्या.

वोटिंग स्लिप वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे.मतदानाच्या एक दिवस आगोदर सर्वांपर्यंत वोटिंग स्लिप पोच होतील. - पवन चांडक ( निवडणूक निर्णय अधिकारी,पनवेल)

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 political parties are step ahead of the election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.