- वैभव गायकर
लोकमत न्युज नेटवर्कपनवेल: काँग्रेसने गरिबी हटाव नारा तर दिला मात्र स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देशातील गरीब अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील सभेत केला. दरम्यान आम्ही जे 10 वर्षात दिले ते काँग्रेस 70 वर्षात देऊ शकले नसल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
खारघर येथील सेंट्रल पार्क शेजारील कॉर्परेट मैदानावर हि सभा पार पडली. यावेळी उपस्थितांध्ये मंत्री रविंद्र चव्हाण ,खासदार सुनील तटकरे,श्रीरंग बारणे,माजी खासदार रामशेठ ठाकुर,आ.गणेश नाईक,आ.प्रशांत ठाकुर,आ.संजय केळकर,आ.मंदा म्हात्रे.आ.महेश बालदी,आ.महेंद्र थोरवे,आ.रवींद्र पाटील ,आ.विक्रांत पाटील,अतुल पाटील,अविनाश कोळी,रामदास शेवाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आपल्या भाषणात मोदी यांनी दहा वर्षाच्या काळात 4 कोटी बेघरांना घरे दिली,12 कोटी गरिबांसाठी शौचालये बांधली ,प्रत्येक घरात बँक खाते उघडले ,12 कोटी घरात नळाचे पाणी पोहचवले तसेच 80 कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला मोफत रेशन देत असल्याचे सांगत रायगड जिल्ह्यात 18 लाख नागरिक याचा लाभ घेत असल्याचे सांगितले.आपल्या भाषणात मोदींनी कॉग्रेसवर सडकून टीका केली मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ,शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा एकदाही उल्लेख केला नाही.कॉग्रेसला ओबीसी समाजात भांडने लावायची आहेत म्हणून ते जाती जातीत लढत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रस्तावनेत पनवेलचे महायुतीचे उमेदवार आ.प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारने राबविलेल्या योजना आणि कामांची माहिति दिली.विरोधक चुकीच्या पद्धतीने खोटे आरोप करीत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.खारघर मधील या सभेला 25 हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.
विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद पडायची आहेविरोधकांना लाडकी बहीण योजना बंद पडायची आहे. ही योजना बंद पाडण्यासाठी ते न्यायालयात देखील गेले. हे लोक जर का सत्तेत आले तर सर्वप्रथम ही योजना बंद पाडतील असा आरोपही मोदी यांनी केला.
पनवेल हा भविष्यातील एआयचे केंद्रपनवेल रायगड हे भविष्यातील एआय (आर्टिफिशल इंटेलिजन्स ) चे केंद्र बनणार आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेला समुद्रा किनारा भविष्यातील ब्लु इकोनॉमीला चालणा देणारा ठरेल, असेही मोदी यांनी सांगितले.