एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही; कर्मचा-यांना गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 02:13 AM2018-01-07T02:13:14+5:302018-01-07T02:13:21+5:30
एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून एसटीला पर्याय नाही. एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालयातर्फे आयोजित गणवेश वाटप सोहळ्यात केले.
वडखळ : एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून एसटीला पर्याय नाही. एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालयातर्फे आयोजित गणवेश वाटप सोहळ्यात केले.
कार्यक्र मास विभाग नियंत्रक विजय गीते, यंत्र अभियंता अजितकुमार मोहिते, विभागीय वाहतूक अधिकारी संजय सुर्वे, प्रवीण पाटील, श्रीनिवास मोरे आदींसह एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. एसटी ही महाराष्ट्राची शान असून लोकमानसात या सेवेबद्दल आजही लौकिक आहे. हा लौकिक जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. एसटीचा कर्मचारी हा रु बाबदार राहिला पाहिजे. त्याला रु बाबदार वेतन मिळाले पाहिजे असे सांगून कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले. गणवेश आपली शान असल्याने त्याचा आदर करण्याचा सल्ला विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगितले.