पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 02:54 PM2018-05-01T14:54:02+5:302018-05-01T14:54:02+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्नी तथा जिल्ह्याचे पालकमंत्नी  रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते  ध्वजवंदन करण्यात आले.

Maharashtra Day celebrate In Raigad Police headquarter | पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात संपन्न

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात संपन्न

Next

- जयंत धुळप 

मुंबई - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्नी तथा जिल्ह्याचे पालकमंत्नी  रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते  ध्वजवंदन करण्यात आले.

 या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक  अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणो, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, तसेच स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. लगेचच राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी निरीक्षण वाहनातून परेडचे निरीक्षण केले. पालकमंत्र्यांना पोलीस दल व अन्य दलांनी मानवंदना दिली. यावेळी परेड कमांडंट भास्कर महादेव शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या शानदार संचलनात पोलीस दल, होमगार्ड, वज्र पथक, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाश पथक आदी पथकांनी सहभाग दिला. पोलीस बॅन्डच्या सुरावर  तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी,नागरिक आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्नसंचालन किरण करंदीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या  वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करु न राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणो, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी   पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले.  यावेळी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच  नागरिक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी  उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Maharashtra Day celebrate In Raigad Police headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.