अलिबाग : अलिबाग व पेण मतदारसंघात काँग्रेसने आपला खरा शत्रू कोण आहे हे ओळखून पावले उचलावीत, असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे दिला. अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे भाजप कार्यकर्ता बूथ मेळावा भाजपतर्फेआयोजित करण्यात आला होता.अलिबागमध्ये मैत्रीपूर्ण लढत आघाडीतून होणार आहे; परंतु या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा कोणाला होणार आहे. याबाबत माजी आमदार मधुकर ठाकूर यांना विचारात घेतले पाहिजे. शेकापबाबत मधुकर ठाकूर यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. असे असताना काँग्रेसने आपला खरा शत्रू कोण हे ओळखणे गरजेचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.शेकापने विकासाच्या नावावर राजकारण करून अलिबाग मतदारसंघ भकास केला आहे. अलिबाग मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर शेकापविरोधात संघर्षच करायला हवा. शिवसेना-भाजप पक्षाचे कार्यकर्ते हे पक्षाचा कणा आहेत तेच विजय सुकर करणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे संपलेला पक्ष आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी के ली. अलिबाग व रोह्याची दोन संस्थाने खालसा करण्याची नामी संधी चालून आली आहे, असेही त्यांनी सांगितले.या वेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी, संपर्कप्रमुख विलास चावरी, अलिबाग मुरुड विधानसभेचे भाजप अध्यक्ष अॅड. महेश मोहिते आदीसह शिवसेना-भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 :काँग्रेसने आपला खरा शत्रू ओळखून पावले उचलावीत- प्रशांत ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:40 AM