Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:37 AM2019-10-05T02:37:16+5:302019-10-05T02:37:53+5:30

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ८० उमेदवारांनी ९८ उमेदवारी अर्ज दाखल केले.

Maharashtra Election 2019: A total of 12 candidates have filed 160 applications in Raigad district | Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल

Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल

Next

अलिबाग : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ८० उमेदवारांनी ९८ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाल्यापासून शुक्रवार, ४ आॅक्टोबरपर्यंत अखरे जिल्ह्यात १३२ उमेदवारांनी एकूण १६० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी ९ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रामुख्याने शेकापचे हरेश केणी, शिवसेनेचे बबन पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. आज अखेर एकूण २१ अर्ज दाखल झाले आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये १३ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड, शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे एकूण १८ अर्ज सादर झाले आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आज सात उमेदवारांनी आठ अर्ज सादर केले. भाजपचे बंडखोर महेश बालदी, शिवसेनेच मनोहर भोईर, अतुल परशुराम भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी अखेर एकूण १३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

पेण मतदारसंघामध्ये १३ उमेदवारांनी १८ उमेदवारी अर्ज दाखल केले. ललित रवींद्र पाटील (भारतीय जनता पक्ष), नंदा राजेंद्र म्हात्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजेंद्र जयराम म्हात्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), धैर्यशील मोहन पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. असे एकूण २४ अर्ज सादर झाले आहेत.

अलिबाग मतदारसंघामध्ये २१ उमेदवारांचे २६ अर्ज आले. अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आस्वाद जयदास पाटील (शेकाप), श्रद्धा महेश ठाकूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), महेश मधुकर ठाकूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजेंद्र मधुकर ठाकूर (अपक्ष) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी अखेर असे एकूण ४२ अर्ज आले.

श्रीवर्धनमध्ये शुक्रवारी नऊ उमेदवारांचे १३ अर्ज

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये नऊ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले. विनेश विजय घोसाळकर-(अपक्ष), अदिती सुनील तटकरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अकमल असलम कादिरी (इंडियन युनियन मुस्लीम लिग), संजय बाळकृष्ण गायकवाड (मनसे)

च् घोसाळकर विनोद रामचंद्र (शिवसेना) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. असे एकूण २३ अर्ज दाखल झाले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी आठ उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज सादर केले. एकूण १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

महाड विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारी अर्ज दाखल 
दासगाव : महाड विधानसभा मतदारसंघात आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेला १९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सहा अपक्ष आणि उर्वरित सात अर्ज हे राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे आहेत.
१९४ महाड विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवार, ४ आॅक्टोबर या अंतिम तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत १९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दोन अर्ज हे डमी उमेदवारांचे आहेत. दाखल केलेल्या अर्जांमध्ये सहा अपक्ष, तर उर्वरित सात उमेदवारांनी राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय कार्यालयात २३ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. यातील शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांनी १ आॅक्टोबर रोजी तर ३ आॅक्टोबर रोजी काँग्रेस उमेदवार माणिक जगताप यांनी त्यांचे चार आणि मुलगी स्नेहल जगताप यांच्या नावाचे चार अर्ज दाखल केले. आशिष जाधव (बहुजन मुक्ती पार्टी), चंद्रकांत धोंडगे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.
४ आॅक्टोबर रोजी मनसेकडून देवेंद्र गायकवाड, जनता दलाकडून मुद्दसीर पटेल, अपक्ष गणेश नाकते, अपक्ष लक्ष्मण निंबाळकर, अपक्ष अशोक जंगले, वंचित बहुजन आघाडीकडून संजय घाग, रोहित पारधे, अपक्ष म्हणून विकास गोगावले यांचे अर्ज दाखल झाले. महाडमध्ये दाखल अर्जात सहा अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत. डमीमध्ये शिवसेनेकडून विकास गोगावले, काँग्रेसकडून स्नेहल जगताप यांच्या अर्जांचा समावेश आहे.

लढत मात्र दोनच पक्षात
१९४ महाड मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ४ आॅक्टोबर रोजी समाप्त झाली आहे. महाड मतदारसंघात १९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पक्ष-अपक्ष अशा वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जनता दल, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि अपक्ष असे उमेदवारी अर्ज भरले असले तरी महाड मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस पक्षातच लढत होणार आहे.
शिवसेना आणि काँग्रेस पक्षाव्यतरिक्त कोणताही उमेदवार शक्तिप्रदर्शन दाखवण्यात सफल ठरला नाही. शिवसेनेने १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना आपला मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी गुरुवारी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
 

Web Title: Maharashtra Election 2019: A total of 12 candidates have filed 160 applications in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.