शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 2:37 AM

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ८० उमेदवारांनी ९८ उमेदवारी अर्ज दाखल केले.

अलिबाग : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ८० उमेदवारांनी ९८ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाल्यापासून शुक्रवार, ४ आॅक्टोबरपर्यंत अखरे जिल्ह्यात १३२ उमेदवारांनी एकूण १६० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी ९ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रामुख्याने शेकापचे हरेश केणी, शिवसेनेचे बबन पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. आज अखेर एकूण २१ अर्ज दाखल झाले आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये १३ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड, शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे एकूण १८ अर्ज सादर झाले आहेत.उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आज सात उमेदवारांनी आठ अर्ज सादर केले. भाजपचे बंडखोर महेश बालदी, शिवसेनेच मनोहर भोईर, अतुल परशुराम भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी अखेर एकूण १३ अर्ज प्राप्त झाले आहेत.पेण मतदारसंघामध्ये १३ उमेदवारांनी १८ उमेदवारी अर्ज दाखल केले. ललित रवींद्र पाटील (भारतीय जनता पक्ष), नंदा राजेंद्र म्हात्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजेंद्र जयराम म्हात्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), धैर्यशील मोहन पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. असे एकूण २४ अर्ज सादर झाले आहेत.अलिबाग मतदारसंघामध्ये २१ उमेदवारांचे २६ अर्ज आले. अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आस्वाद जयदास पाटील (शेकाप), श्रद्धा महेश ठाकूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), महेश मधुकर ठाकूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजेंद्र मधुकर ठाकूर (अपक्ष) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी अखेर असे एकूण ४२ अर्ज आले.श्रीवर्धनमध्ये शुक्रवारी नऊ उमेदवारांचे १३ अर्जश्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये नऊ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले. विनेश विजय घोसाळकर-(अपक्ष), अदिती सुनील तटकरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अकमल असलम कादिरी (इंडियन युनियन मुस्लीम लिग), संजय बाळकृष्ण गायकवाड (मनसे)च् घोसाळकर विनोद रामचंद्र (शिवसेना) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. असे एकूण २३ अर्ज दाखल झाले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी आठ उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज सादर केले. एकूण १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.महाड विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारी अर्ज दाखल दासगाव : महाड विधानसभा मतदारसंघात आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेला १९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सहा अपक्ष आणि उर्वरित सात अर्ज हे राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे आहेत.१९४ महाड विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवार, ४ आॅक्टोबर या अंतिम तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत १९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दोन अर्ज हे डमी उमेदवारांचे आहेत. दाखल केलेल्या अर्जांमध्ये सहा अपक्ष, तर उर्वरित सात उमेदवारांनी राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय कार्यालयात २३ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. यातील शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांनी १ आॅक्टोबर रोजी तर ३ आॅक्टोबर रोजी काँग्रेस उमेदवार माणिक जगताप यांनी त्यांचे चार आणि मुलगी स्नेहल जगताप यांच्या नावाचे चार अर्ज दाखल केले. आशिष जाधव (बहुजन मुक्ती पार्टी), चंद्रकांत धोंडगे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.४ आॅक्टोबर रोजी मनसेकडून देवेंद्र गायकवाड, जनता दलाकडून मुद्दसीर पटेल, अपक्ष गणेश नाकते, अपक्ष लक्ष्मण निंबाळकर, अपक्ष अशोक जंगले, वंचित बहुजन आघाडीकडून संजय घाग, रोहित पारधे, अपक्ष म्हणून विकास गोगावले यांचे अर्ज दाखल झाले. महाडमध्ये दाखल अर्जात सहा अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत. डमीमध्ये शिवसेनेकडून विकास गोगावले, काँग्रेसकडून स्नेहल जगताप यांच्या अर्जांचा समावेश आहे.लढत मात्र दोनच पक्षात१९४ महाड मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ४ आॅक्टोबर रोजी समाप्त झाली आहे. महाड मतदारसंघात १९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पक्ष-अपक्ष अशा वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जनता दल, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि अपक्ष असे उमेदवारी अर्ज भरले असले तरी महाड मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस पक्षातच लढत होणार आहे.शिवसेना आणि काँग्रेस पक्षाव्यतरिक्त कोणताही उमेदवार शक्तिप्रदर्शन दाखवण्यात सफल ठरला नाही. शिवसेनेने १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना आपला मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी गुरुवारी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

टॅग्स :RaigadरायगडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019