उरण मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:49 PM2019-10-24T23:49:42+5:302019-10-25T00:10:54+5:30

मनोहर भोईर यांना पराभवाचा धक्का; तिरंगी लढतीत महेश बालदी यांची बाजी

Maharashtra Election 2019: Uran constituency finally waves of change | उरण मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट

उरण मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट

Next

- मधुकर ठाकूर

उरण : महायुतीला आव्हान देणाऱ्या भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी अखेर सेनेचे मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारत उरण विधानसभा मतदारसंघात विजयाची पताका फडकावली. अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीकडे तमाम राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उरणकरांचेही लक्ष लागून राहिले होते. सेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या कारभाराला कंटाळून अखेर सूज्ञ मतदारांनीच भोईर यांना पराभवाचा धक्का देऊन मतदारसंघात परिवर्तन घडवले.

भविष्यात देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून उरण उदयास येत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात जोरदार लढाई सुरू होती. उरणमध्ये तिन्ही उमेदवारांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी घमासान सुरू होते. परस्परांविरोधात दररोजच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. जातीपातीच्या हीन प्रचारामुळे प्रचाराची पातळी अत्यंत खालावली होती. ‘मते मागतो आहे, मुलगी नव्हे’ या बालदी यांच्या वक्तव्यांविरोधात तर शेकाप, सेनेने रान उठविले होते.

जनता, कार्यकर्त्यांना वेळ न देऊ शकणाºया आणि कार्यकर्त्यांची कदर नसलेल्या व जनतेच्या विकासकामांऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांच्याविरोधात काही नाराज शिवसैनिकच उभे ठाकले होते. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी हितचिंतकांना जवळ केले होते, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी दूर केले. मतदारसंघात फारशी लोकोपयोगी कामे केली नसल्याने अखेर प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाचारण करण्याची पाळी आली होती.

मात्र, उद्धव ठाकरे यांची प्रचारसभाही भोईर यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. तीच स्थिती शेकाप उमेदवार विवेक पाटील यांची झाली आहे. स्वबळावर घुमवला शिटीचा आवाज भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी उरण मतदारसंघात केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरले. पक्षातून निष्कासित करण्यात आले असले तरी पुन्हा पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रचारपत्रके, फ्लेक्स यांच्यावरही भाजप नेत्यांचे बिनदिक्कतपणे फोटो लावले.

यासाठी भाजप नेत्यांचा बालदी यांना छुपा पाठिंबा मिळत होता. हे काही लपून राहिलेले नाही. त्याशिवाय जाहीर सभा, कॉर्नर सभांचे शिस्तबद्ध नियोजन आणि त्यासाठी भली मोठी तरुण कार्यकर्त्यांची फौज यांच्या भरघोस पाठिंब्यावर महेश बालदी यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वबळावर उरणमध्ये शिटीचा आवाज घुमवला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Uran constituency finally waves of change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.