सुधागड तालुक्यात मतदान शांततेत; ६० टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:48 PM2019-10-21T23:48:48+5:302019-10-21T23:49:27+5:30
Maharashtra Election 2019: सुधागड तालुक्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बजावला.
पाली : सुधागड तालुक्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बजावला. तालुक्यात एकूण मतदान करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व बूथवरील मतदान शांततेत पार पडले. या वेळी सर्व कें द्रांवर चोख पोलीस बंदोबस्त होता.
२०१४ च्या निवडणुकीत आणि आताच्या २०१९ च्या निवडणुकीत बराचसा बदल झालेला असून मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मतदान करणे हा लोकशाहीचा अधिकार व हक्क आहे आणि तो हक्क मतदान करून बजावलाच पाहिजे या हेतूने मुंबई, पुणे, ठाणे, मालाड, नालासोपारा, घाटकोपर, अंधेरी, डोंबिवली येथील चाकरमानी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. तसेच तालुक्यातील पाली, राबगाव, जांभूळपाडा, परळी, नाडसुर, नांदगाव, आपटवणे, पाच्छापूर, मानखोरे या पंचक्रोशीतील बूथवर शांततेत मतदान पार पडले. तसेच दिव्यांग मतदारांनीही उत्साही वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावला.
या वेळी सुधागडातील तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था के ली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहवी यासाठी मतदान केंद्रावर व परिसरात पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आले होते. तसेच तालुक्यातील मतदान केंद्रावर पुरुष व महिला मतदार अशा दोन सुव्यवस्थित मोठ्या रांगा लागल्या होत्या.