- राजेश भोस्तेकरअलिबाग - रायगड लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षा विरोधात वंचित आघाडीने ही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाड मधील कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर केली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितने दिली आहे. २०१९ मध्ये सुमन कोळी यांनी वंचित तर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. कोळी याना २५ हजार मताधिक्य पडले होते.
कुमुदिनी चव्हाण यांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्याच्या जवळ ओतूर गावात प्राध्यापक आर, बी, डुंबरे व आई कृष्णाबाई डुंबरे पाटील यांच्या त्या कन्या आहेत. रवींद्र चव्हाण हे पती असून वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. कुमुदिनी चव्हाण ह्या उच्च शिक्षित असून महाड येथे मॉडर्न इंग्लिश स्कूल नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत आहेत. सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.
वंचित आघाडी तर्फे कुमुदिनी चव्हाण यांना रायगड लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. भारतीय मराठा महासंघाच्या त्या जिल्हा अध्यक्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाचा चेहरा यावेळी दिला आहे. गतवेळी सुमन कोळी यांनीही मतदार संघात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी कुमुदिनी चव्हाण या बलाढ्य उमेदवारांसमोर नक्कीच आपला करिश्मा दाखवतील. चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे रायगड लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होनाची शक्यता निर्माण झाली आहे.