शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एलिफंटा बेटावरील ८३ स्थानिक गरीब व्यावसायिकांना दुकाने हटविण्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 9:36 PM

गरीब कुटुंब  रस्त्यावर येण्याची भीती 

मधुकर ठाकूर

उरण : एलिफंटा बेटावर मागील ५० वर्षांपासून पर्यटक आधारित व्यवसाय करणाऱ्या गरीब  स्थानिकांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आठ दिवसात दुकाने काढण्यासाठी धमकावले आहे. रोजीरोटीला मुकावे लागणार असल्याने गरीब व्यावसायिकांवर उपासमारीची संकट येऊन ठेपण्याची भीती निर्माण झाल्याने बेटावरील ८३ कुटुंबियांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एलिफंटा बेटावर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत शेतबंदर जेट्टीपासुन एक किमी अंतरापर्यंतच्या पोच मार्गापर्यत ८३ स्थानिक व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत.मागील ५० वर्षांपासून हे स्थानिक गरीब व्यावसायिक छोटी-छोटी दुकाने थाटून चणे-फुटाणे, मके, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या, शोभिवंत वस्तू, कटलरी सामान, खाद्य पदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीतील जागा असल्याने भुईभाडे लागु करण्याची अनेक वर्षांपासून व्यावसायिकांची मागणीआहे.मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांच्या या रास्त मागणीकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात आहे.

बेटावर पर्यटक आधारित पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही.त्यामुळे या स्थानिक गरीब व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारे उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत.

पर्यटक आधारित पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने खासदार निधीतून बेटावरील या ८३ गरीब व्यावसायिकांना व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर, सुशोभित एकसारखी दिसणारी आणि एकाच आकाराची दुकाने तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.आराखडा तयार करून दिलेला प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजुरीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे .मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मेरिटाईम बोर्डाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी प्रलंबित आहे. स्थानिकच झारीतील काही राजकीय शुक्राचार्य गरीब व्यावसायिकांना आडवे जात असल्याने स्थानिक ८३ व्यावसायिकांचा प्रश्न आणखीनच जटील बनला असल्याचा आरोप या  व्यावसायिकांकडून केला जात आहे.

दरम्यान मागील आठवड्यात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे ठाणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी संबंधित ८३ व्यावसायिकांनाही चर्चा करण्यासाठी ठाणे येथील कार्यालयात पाचारण केले होते.या बैठकीत राजकीय दबावाखाली असलेल्या सीईओनी व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून न घेताच आठ दिवसात दुकाने हटविण्याची धमकी वजा आदेशच दिले असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गरिबांवर येऊ घातलेले उपासमारीचे संकट  दूर करण्यासाठी या ८३ व्यावसायिकांनी पत्राद्वारे घारापुरी ग्रामपंचायतीलाच यातून मार्ग काढण्याची विनंती  केली आहे.व्यावसायिकांच्या पत्रानंतर  घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीनेही सरपंच मीना भोईर,उपसरपंच बळीराम ठाकूर यांनीही स्थानिक गरीब व्यावसायिकांचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्याची विनंती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सीईओंना पत्राद्वारे केली आहे.