उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सुरू झालेल्या उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील तरघर स्थानकात लोकलची महावितरणने वाट अडवली आहे. महावितरणने वीजपुरवठा करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यानेच या स्थानकात पाच वर्षांपासून रेल्वे थांबत नाही. महावितरणच्या गलथान कारभारामुळे परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरून १२ जानेवारीपासून प्रवासी वाहतूक सुरू झाली. तरघर स्थानकाचे काम सिडकोने केले आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या स्थानकाचे रुफिंग आणि विद्युतीकरणाचे काम अद्यापही बाकी आहे. सिडकोने महावितरणकडे वीजपुरवठा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत वीजपुरवठा?लाइन शिफ्टिंग, केबल्स अटॅचमेंट आणि सिव्हिल वर्क्स आदी कामांच्या विलंबामुळे तारघर स्थानकाला वीजपुरवठा करणे शक्य झालेले नाही. फेब्रुवारीअखेर वीजपुरवठा सुरू करणार असल्याचा दावा महावितरणच्या अधिकारी नेहा डहाळे यांनी केला.
गव्हाण स्थानकाचेही काम अपूर्णउरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील तरघर स्थानकाबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील मध्य रेल्वेच्या अखत्यारीत सुरू असलेल्या गव्हाण स्थानकाचेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही, यामुळे या मार्गावरील दोन्ही स्थानकांवर लोकल थांबत नाही.