महावितरणला १७ लाख रुपयांचा शॉक

By admin | Published: October 7, 2015 12:08 AM2015-10-07T00:08:20+5:302015-10-07T00:08:20+5:30

महाड परिसरात गेले पाच दिवस वादळी पावसाने थैमान घातले असून, त्याचा जबरदस्त फटका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला बसला आहे. महाड तालुक्यातील वाळण

MahaVitaran has a shock of 17 lakh rupees | महावितरणला १७ लाख रुपयांचा शॉक

महावितरणला १७ लाख रुपयांचा शॉक

Next

बिरवाडी : महाड परिसरात गेले पाच दिवस वादळी पावसाने थैमान घातले असून, त्याचा जबरदस्त फटका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला बसला आहे. महाड तालुक्यातील वाळण, महाड शहर, नातेखिंड, मोहोप्रे, करंजाडी लोखंडे कोंड या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर वीज कोसळून निकामी झाले आहेत. त्यामुळे महावितरणचे १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये वाळण येथील २५ केव्ही विद्युत ट्रान्सफॉर्मर १ लाख १३ हजार, ६३ केव्ही विद्युत ट्रान्सफॉर्मर करंजाडी लोखंडे कोंड, तर मोहोप्रे येथील प्रत्येक खर्च १ लाख ४० हजार एकूण २ लाख ८० हजार यासह वाळण येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे १० पोल कोसळले आहेत. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील कुसगाव, शिंदेकोंड, गारपाटले या ठिकाणी घरगुती विद्युत वाहिनीचे खांब कोसळले आहेत. १ आॅक्टोबरपासून १० कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या व दोन सुपरवायझर असे एकूण २२ कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.
गेल्या पाच दिवसांत विद्युत वितरण कंपनीचे सुमारे १७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपविभागीय कार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजण यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: MahaVitaran has a shock of 17 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.