जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By राजेश भोस्तेकर | Published: November 29, 2023 04:18 PM2023-11-29T16:18:59+5:302023-11-29T16:20:18+5:30

डिसेंबर अखेरपर्यंत क्रीडा संकुल दुरुस्त करून देण्याचेही आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी सबंधीत आधिकार्‍यांना दिले.

Make funds available immediately for the repair of the district sports complex, ordered the Collector | जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अलिबाग : कोव्हिड काळात रुग्ण संख्या वाढू लागल्याने अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे तातडीने कोव्हिड केंद्र सुरू करण्यात आले होते. कोव्हिड काळ संपल्यानंतर आरोग्य विभागाने क्रीडा संकुलमधील केंद्र बंद केले. मात्र संकुलातील वापराने ते नादुरुस्त ठेवून दुरुस्त न करता आरोग्य विभागाने आपली जबाबदारी झटकली. यावेळी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून जिल्हा क्रीडासंकुलाची दुरूस्तीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच इतर कामांसाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातून निधी द्यावा. डिसेंबर अखेरपर्यंत क्रीडा संकुल दुरुस्त करून देण्याचेही आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी सबंधीत आधिकार्‍यांना दिले.

जिल्हा क्रीडासंकुल समितीची बैठक बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकित जिल्हधिकारी यांनी जिल्हा क्रीडासंकुलाच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला.

कोव्हिड काळात जिल्हा क्रीडासंकुलात कोव्हिड केंद्र सुरू करण्यात आले होते. कोव्हिड केंद्र सुरू केल्याने हे क्रीडासंकुल इतर वापरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती.  त्यामुळे या संकुलाचा दोन वर्ष वापर होऊ शकला नाही. तसेच क्रीडा विभागाचे आर्थिक नुकसानही झाले. 

कोव्हिड प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर केंद्र बंद करण्यात आले. केंद्र बंद केल्यानंतर आजही संकुलात आरोग्य विभागाचे साहित्य पडून आहे. तसेच संकुलाची तोडफोड होऊन ते नादुरुस्त झाले आहे. संकुलात साहित्य असल्याने इन डोअर खेळ ही खेळता येत नाही. हे संकुल वापरात होते तेव्हा वर्षाल किमान १० लाख रुपये उत्पन्न मिळत होते.  क्रीडासंकुल वापराविना पडून असल्यामुळे हे उत्पन्न देखील बंद झाले आहे.  कोव्हिड केंद्राचे भाडे व संकुल दुरूस्ती साठी ३० लाखाचा निधी द्यावाअशी मागणी क्रीडा अधिकारी यांनी पत्राव्दारे  केली होती. परंतु हा निधी देण्यात आला नाही, अशी माहिती क्रीडा विभागकडून या बैठकित देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी यावेळी आरोग्य अधिकारी यांना धारेवर धरले. कोव्हिड केंद्रासाठी जर हे क्रीडासंकुल वापरले होते तर त्याचे भाडे देणे तसेच या संकुलाची दुरुस्ती करून ते पूर्वत करून द्यायची जबाबदारी ही संबंधीत अधिकर्‍यांची होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या दुरुस्ती साठी निधी देण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक यांची आहे. कोव्हिडसाठी आलेल्या निधीपैकी जो निधी शिलक असेल तेवढा निधी आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक  यांनी ताबडतोब उपलब्ध करून द्या. तसेच नियोजन अधिकार्‍यांनी  संकुलाच्या इतर  कामांसाठी  जिल्हा वार्षिक आराखड्यातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश जिल्हा अधिकार्‍यांनी या बैठकित संबंधीत अधिकार्‍यांना दिले.

क्रीडा संकुल उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा

क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सध्या शासन स्तरावरून निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे क्रीडा संकुलाना स्वतः च प्रयत्न करून निधी उपलब्ध करावा लागत आहे. जिल्हा क्रीडासंकुलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी संपूर्ण क्रीडासंकूल वापरासाठी कोणी घेत आहे काय किंवा क्रीडा प्रकारचे मैदान कोणी वापरासाठी घेत आहे का याबाबत प्रयत्न करा असे आदशे जिल्हाधिकारी तथ जिल्हा क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी दिले.

Web Title: Make funds available immediately for the repair of the district sports complex, ordered the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.