उच्च शिक्षणासाठी आवश्यक तरतूद करणार
By admin | Published: February 11, 2015 05:38 AM2015-02-11T05:38:00+5:302015-02-11T05:38:00+5:30
ज्ञान साधनेचा मार्ग सर्वांसाठी खुला असला पाहिजे. शिक्षणाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे राज्य शासनातर्फे उच्च शिक्षणात
पुणे : ज्ञान साधनेचा मार्ग सर्वांसाठी खुला असला पाहिजे. शिक्षणाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे राज्य शासनातर्फे उच्च शिक्षणात आवश्यक ती आर्थिक तरतूद केली जाईल. त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक येथील उपकेंद्रांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल,असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा ‘जीवनसाधना’ गौरव पुरस्काराचे मुनगंटीवार यांच्या हस्ते लेखक डॉ. अनिल अवचट, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा, सिंधुताई विखे-पाटील, उद्योजक बेबीलाल संचेती, विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, अभिनेता दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठसाहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना वितरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नरेंद्र कडू तसेच विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते. उत्कृष्ट महाविद्यालय,उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराच्या वितरणासह गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे यांना,तर गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार निर्मला यादव, भागोजी हेरकर, संजय वेताळे ,चंद्रकांत शेळके, पांडुरंग बावदाने, चंद्रकांत भोर तसेच गुणवंत कर्मचारी पुरस्कार राजाराम पोटे यांना देण्यात आला.
मुनगंटीवार म्हणाले की, जोपर्यंत आमदार किंवा मंत्रीपद आहे तोपर्यंत समाजाचा सेवक म्हणून काम
केले पाहिजे. आज केवळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनावर
सुमारे ३९ हजार कोटी रुपये खर्च
होत आहे,असे असताना शंभरामधील केवळ १२ बारा विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. (प्रतिनिधी)