मुरुड : मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे देश-विदेशातील नागरिक येत असतात. या ठिकाणी बीएसएनएलची नेटसेवा २४ तास सुरू राहिली पाहिजे. दिवसेंदिवस बीएसएनएलची सेवा डळमळीत झाल्याने, याचा त्रास संपूर्ण रायगड जिल्ह्यास सहन करावा लागत आहे. आपण कारभार सुधारा, अन्यथा मला दिल्लीत आपली तक्रार करावी लागेल. पोस्ट कार्यालयातील अधिकारी व बीएसएनएलचे अधिकारी यांनी संयुक्तिक एकत्र काम करून मुरुड तालुक्याचा कारभार सात दिवसांच्या आत सुधारा. जोपर्यंत येथील दोन्ही सेवा सक्षम होत नाहीत, तोपर्यंत कोणीही मुरुड सोडून जाऊ नये, असे स्पष्ट आदेश रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत.
काही दिवसापूर्वी बीएसएनएलची नेटसेवा बंद असल्याने पोस्ट खात्यातील कारभार ठप्प झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सभा घेऊन निर्देश दिले आहेत. मुरुड तहसील कार्यालयात सभा झाली, यावेळी मुरुड बीएसएनएल कार्यालयातील रूपेश पाटील हे ग्राहकांना नीट उत्तर न देणे, सेवा अविरत सुरू राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करणे, अशा अनेक तक्रारी खासदारांसमोर मांडल्या. यावेळी खासदार तटकरे यांनी जनरल मॅनेजर डी.के.शर्मा यांना त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाºयांनी कमचारी कमी असल्याचे व मुंबई-गोवा रस्त्याच्या नवीन कामामुळे वायरी तुटल्याने सेवा विस्कळीत होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. यावर खासदार सुनील तटकरे यांनी मला कारणे देऊ नका. सात दिवसांत ही समस्या दूर करा.यावेळी पोस्ट खात्याचे जिल्हा अधीक्षक उमेश जनावडे यांनी लवकरच आम्ही एनएसपी २ चा वापर मुरुड पोस्ट कार्यालयासाठी करणार आहोत. त्याचप्रमाणे, एएफजी डोंगलची सुविधाही पुरवणार असल्याचे यावेळी सांगितले. सभेत तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, सभापती अशिका ठाकूर, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, पोस्ट खात्याचे जिल्हा अधीक्षक उमेश जनावडे, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर डी.के.शर्मा, सहायक जनरल मॅनेजर सचिन पोहाडकर, मुरुड सब पोस्ट मास्टर फैयाज पंचुळकर, तहसीलदार गमन गावित आदी उपस्थित होते.दोन्ही खात्यांनी आपापसात चर्चा करावी : खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही खात्यांनी आपापसात चर्चा करून सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावेत, भविष्यात कोणतीही यंत्रणा बंद पडणार नाही, याकडे विशेष लक्ष देणे, ग्राहकांना आॅप्टिकल फायबरची सेवा जलद गतीने मिळण्यासाठी बीएसएनएलने आपले काम जलद गतीने पूर्ण करावेत, असे आदेश दिले. त्याचप्रमाणे, वाढीव वीजबिलाच्या तक्रारी निवारण करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांना मुरुड येथे पाचारण करून सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासित केले.भरपाईसाठी प्रयत्नशीलच्पदमदुर्ग व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त टपरीधारकांना मदत करण्याची विनंती केली. खासदार सुनील तटकरे यांनी आपणास भरपाई मिळावी, यासाठी मी जिल्हाधिकारी व सचिव यांच्याशी बोलून घेतो व आपले काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.च्यावेळी मुरुड समुद्रकिनाºयावर भरतीचे पाणी सुरुच्या झाडांमध्ये शिरकाव केल्याने सर्व झाडे उन्मळून पडत आहेत, त्यामुळे समुद्राचे सौदर्य नष्ट होत असल्याची बाब पत्रकारांनी खासदार यांच्या निदर्शनास आणून देताच, त्यांनी पालकमंत्री यांच्या दालनात पतन विभागाचे कार्यकारी अभियंता व सर्व अधिकारी यांची सभा लावण्याचे आदेश दिले