शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कुपोषणमुक्त मोहिमेस रिक्त पदांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:01 AM

एकात्मिक बालविकास सेवा योजना; जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांची ३८६ पदे रिक्त

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रांतील बालकांची कुपोषणमुक्ती, प्रसूती दरम्यानच्या आदिवासी माता व बालमृत्यू रोखण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष मोहीम गेले वर्षभर हाती घेतली असून त्यांचे सकारात्मक परिणाम साध्य होत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याने कर्जत तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यांना देखील डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू करून कुपोषणमुक्तीच्या या मोहिमेस गतिमान केले; परंतु त्याच वेळी या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता कार्यरत जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २ हजार ६७९ मंजूर पदांपैकी तब्बल ३८६ पदे रिक्त असल्याने ही रिक्त पदांची समस्या कुपोषणमुक्ती मोहिमेत मोठा अडसर ठरली आहे.रायगड जिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण १७ आदिवासी प्रकल्प मंजूर असून, या प्रकल्पामार्फत एकूण तीन हजार २४६ अंगणवाड्यांच्या माध्यमातून अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक आहार वाटप, लसीकरण, संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण आणि आरोग्य तपासणी या अत्यंत महत्त्वाच्या सहा सेवा पुरविल्या जातात, ज्यांचा जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनात महत्त्वाचा वाटा आहे. अंगणवाडी सेविका या सर्व कामे करण्यास बांधील असून त्यांच्यामार्फत गावस्तरावर या योजनांची अंमलबजावणी केली जाते.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शासनाची महत्त्वाकांक्षी अशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू आहे. त्या योजनेची अंमलबजावणीही अंगणवाडी मार्फत के ली जाते. त्याच बरोबर एप्रिल २०१९ पासून जिल्ह्यात वाढीव अमृत आहार योजना सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेमधून कुपोषित मुले, गरोदर स्तनदा माता यांना लाभ होणार आहे.या सर्व परिस्थितीत रायगड जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, सुपरवायझर व अंगणवाडी सेविकांची अनेक पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्यामुळे अमृत आहार सारख्या योजनांची तसेच अंगणवाडीच्या इतर सहा योजनांचीदेखील प्रभावी अंमलबजावणी होत नाही. परिणामी, जिल्ह्यात कमी येत असलेले कुपोषणाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्तजिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या १७ मंजूर पदांपैकी आठ रिक्त, तर मुख्य सेविकांच्या १०८ मंजूर पदांपैकी २२ पदे रिक्त असल्याने योजनेच्या प्रशासकीय अंमलबजावणीवरच विपरित परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या दोन हजार ६७९ मंजूर पदांपैकी १०८ पदे रिक्त आहेत. मदतनिसांच्या मंजूर दोन हजार ६७९ पदांपैकी १६४ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या ६०५ मंजूर पदांपैकी ८४ पदे रिक्त आहेत.अंगणवाडी संबंधित सर्व रिक्त पदे तत्काळ भरावी आणि त्याचबरोबर अधिक कुपोषण संख्या असणाऱ्या अंगणवाड्यांच्या क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी लेखी मागणी आम्ही रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने त्यांच्याशी सकारात्म चर्चादेखील झाली आहे.- अशोक जंगले, समन्वयक, पोषण सेवांवर देखरेख प्रकल्प, रायगडएकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अन्य संबंधित पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. ती तत्काळ भरण्यात यावीत, याकरिता आम्ही शासनाकडे प्रस्तावदेखील दाखल केला आहे. मात्र, या भरतीस शासनानेच स्थगिती दिली आहे. शासनाकडून मान्यता मिळाल्यास ही भरती करता येऊ शकेल.- अभय यावलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद