अवकाळी पावसामुळे मंडप डेकोरेटर्स व्यवसाय धोक्यात; व्यावसायिक हतबल

By निखिल म्हात्रे | Published: December 3, 2023 05:09 PM2023-12-03T17:09:22+5:302023-12-03T17:09:55+5:30

कोरोनानंतर आर्थिक घडी बसत असताना नवे संकट

Mandap decorators business threatened due to unseasonal rains; Professional desperation | अवकाळी पावसामुळे मंडप डेकोरेटर्स व्यवसाय धोक्यात; व्यावसायिक हतबल

अवकाळी पावसामुळे मंडप डेकोरेटर्स व्यवसाय धोक्यात; व्यावसायिक हतबल

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील मंडप व डेकोरेशन, फटका कुंभारकाम आदी व्यवसायांना बसला आहे. कोरोनानंतर आर्थिक घडी बसताना मागील आठवड्यापासून सतत बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे हे व्यवसाय डबघाईला आल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.

पावसामुळे मडकी, चुली व मातीच्या इतर वस्तू आणि खेळणी खराब झाल्या आहेत. शिवाय, पाऊस आणि गारवा असल्याने मडकी व चलींची विक्रीही थांवली आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे हा व्यवसाय पूर्ण डबपाईला आला होता. यावर्षी काही प्रमाणात व्यवसाय तग धरत असतानाच अवकाळी पावसाने अवकृपा केली. पावसामुळे तयार वस्तू तर भिजल्याच; पण मडकी व इतर मातींच्या वस्तू भाजण्यासाठी लागणारा पेंढा, लाकडे व कोळसाही भिजला आहे. त्यामुळे भट्टी लावणे अवघड झाले आहे. माती भिजल्याने ती पुन्हा वापरता येणार नाही. मालाला उठाव सुद्धा मिळत नाही. त्यात झालेल्या नुकसानीमुळे खूप वाताहत होत आहे. असे नारायण बिरवाडकर या व्यावसायिकाने सांगितले.

कोरोनाचे सावट कमी झाल्यावर जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय वाढत आहे. या बांधकाम व्यवसायात वीटभट्टी हा कणा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय रुजला आणि वाढला आहे. दरवर्षी पावसाळा कमी झाल्यावर सर्वच वीटभट्ट्यांवर कामाची लगबग सुरू होते; मात्र यदा पाऊस खूपच लावला. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भात शेतीबरोबरच बांधकाम व्यवसायाचे जणू कंबरडेच मोडले. या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. सध्या लगीन सराई व सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे काही ऑर्डर रद्द झाल्या अनेकांचे मांडवाचे कापड व इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून खराब झाल्यात. 
- राकेश थळे, मंडप व डेकोरेशन व्यावसायिक

Web Title: Mandap decorators business threatened due to unseasonal rains; Professional desperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग