मांडवा ते गेट वे बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:20 AM2020-08-10T00:20:10+5:302020-08-10T00:20:16+5:30

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

Mandwa to Gateway boat ambulance service soon | मांडवा ते गेट वे बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा लवकरच

मांडवा ते गेट वे बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा लवकरच

googlenewsNext

रायगड : मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाइल मेडीकल युनिटसह बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. याबाबतचा शासन निर्णय ७ ऑगस्ट २०२० रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गिमत करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे पालकमंत्री तटकरे यांनी विशेष आभार मानले आहेत.

ही बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

खर्च बाह्य यंत्रणेकडून
मेडिकल युनिटसाठी लागणारी बोट, यंत्रसामुग्री, औषधे, कर्मचारी वर्ग, इंधन खर्च हे सर्व खर्च नेमण्यात येणाऱ्या बाह्य यंत्रणेकडून करण्यात येतील. काम सुरू झाल्यावर प्रति महिना परिचालन खर्चाचे देयक या बाह्य यंत्रणेस सरकारकडून अदा करण्यात येईल. बाह्य यंत्रणेची सेवा घेण्याबाबतचे दर निविदा प्रक्रियेअंती निश्चित करण्यात येणार आहेत.

Web Title: Mandwa to Gateway boat ambulance service soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.