माणगाव तालुक्यात ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

By admin | Published: February 14, 2017 04:59 AM2017-02-14T04:59:05+5:302017-02-14T04:59:05+5:30

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील जागांसाठी सार्वत्रिक

In Mangaon taluka, 43 candidates are in the fray | माणगाव तालुक्यात ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

माणगाव तालुक्यात ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Next

माणगाव : नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी ४८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, पैकी तीन अर्ज छाननीत बाद झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ७२ उमेदवारी अर्जांपैकी २९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी १३ उमेदवार तर पं. स. च्या ८ जागांसाठी ३० उमेदवार असे ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पुढील काही दिवस माणगावातील राजकीय वातावरण जोरदार ढवळून निघणार असून खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षातच होणार आहे.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४ विविध उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निजामपूर जिल्हा परिषद (अनु. जमाती महिला) गटातून शिवसेनेच्या द्रौपदी पवार, राष्ट्रवादीच्या भिका कोळी, भाजपाच्या हिरा वाघमारे, तळाशेत जिल्हा परिषद (नामाप्र महिला) गटातून शिवसेनेच्या स्वाती नवगणे, राष्ट्रवादीच्या संगीता बक्कम, राष्ट्रीयच्या सुप्रिया पवार, भाजपाच्या हर्षदा खेकडे, मोर्बा जिल्हा परिषद (नामाप्र महिला) गटातून राष्ट्रवादी -शेकाप आघाडीच्या आरती मोरे, राष्ट्रीयच्या सलोनी दळवी व शिवसेनेच्या सुश्मिता म्हसकर, गोरेगाव जिल्हा परिषद (अनुसूचित जाती महिला) गटातून शिवसेनेच्या अमृता हरवंडकर, राष्ट्रवादीच्या विजया गायकवाड, भाजपाच्या आरती महाले पंचायत समितीसाठी पाटणूस गणातून शिवसेनेच्या ममता फोंडके, राष्ट्रवादीच्या सुप्रिया कदम, भाजपाच्या अर्चना कोदे, निजामपूर गणातून राष्ट्रवादीच्या मीनाक्षी रणपिसे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कविता कोळवणकर,शिवसेनेच्या माधवी समेळ, भारिप बहुजन महासंघाच्या प्रीती शेलार, भारतीय जनता पक्षाच्या उषा कासार, तळाशेत गणातून राष्ट्रवादीच्या अलका जाधव, शिवसेनेच्या शशिकला हिलम, राष्ट्रीय काँग्रेसच्या गौरी जंगम, भाजप देवका मोरे, साई गणातून शिवसेनेचे सुशीलकुमार दसवते, राष्ट्रीय काँग्रेसचे अनिस इब्राहिम सोलकर, राष्ट्रवादीचे शैलेश बाबूराव भोनकर, भाजपाचे गजानन भोनकर, भारिप बहुजन महासंघाकडून रमेश गणू गायकवाड हे उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: In Mangaon taluka, 43 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.