पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:22 PM2024-06-06T21:22:04+5:302024-06-06T21:22:14+5:30
मंगेश चितळे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.
पनवेल: पनवेल महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले असून मंगेश चितळे यांची दि.6 रोजी आयुक्त पदी नियुक्त करण्यात आली होती.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या आयुक्त गणेश देशमुख यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ हे प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत होते.
मंगेश चितळे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे चितळे यांनी यापूर्वी पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच पालिकेत उपायुक्त म्हणून पदभार सांभाळले आहे.लोकसभा निवडणुकेच्या आचारसंहितेमुळे नव्या आयुक्तांची नीत्युक्ती रखडली होती.नुकताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्याने नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीने चितळे यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.