देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे लागलेल्या वणव्याचा फटका आंबा व काजूच्या ३८ बागायतदारांना बसला आहे. बागायतदारांचे ८८ लाख ७१ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नांदळज येथे वणवा लागला. गवत व सुकलेला पालापाचोळा असल्याने काही क्षणातच आगीचा भडका उडाल्याने आंबा, काजूच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या प्रकाराचा पंचनामा तलाठी, सरपंच आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. यात ३८ बागायतदारांचे ८८ लाख ७१ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त आंबा, काजू बागायतदारांमध्ये केशव रहाटे (५२ हजार ५०० रूपये), आत्माराम बोथले (७ लाख ५० हजार), रेश्मा पांचाळ (३७ हजार ५००), हनुमंत तावडे (४५ हजार), संभाजी किंजळे (२ लाख ७० हजार), सदाशिव रहाटे (३ लाख), घनश्याम रहाटे (७५ हजार), प्रकाश मांडवकर (४ लाख ५० हजार), केरू रहाटे (५ लाख ४० हजार), संतोष डोंगरे (५२ हजार ५००), सविता पाब्ये (३७ हजार ५००), गणपत बोथले (१ लाख १२ हजार ५००), प्रकाश रहाटे (१ लाख २० हजार), अनंत रहाटे (४५ हजार), शिवराम पांचाळ (५ लाख ७० हजार), रामचंद्र गोवळकर (२ लाख २५ हजार), अनिल गोवळकर (१ लाख ५० हजार), सुरेश पाब्ये (३७ हजार ५००), सुलोचना कानसरे (२ लाख २५ हजार), सुलोचना सुतार (७५ हजार), दशरत रहाटे (४ लाख ५० हजार).नथुराम पांचाळ (३७ हजार ५००), आत्माराम पांचाळ (१ लाख ५० हजार), प्रेमा सुतार (३ लाख), जयवंत डोंगरे (१ लाख ५० हजार), सोमा कावणकर (१ लाख ५० हजार), महादेव रहाटे (१ लाख ८० हजार), सुमती सुवारे (६ लाख), विलास गोवळकर (९ लाख ७५ हजार), सखाराम किंजळे (३ लाख ३१ हजार), दौलत डुकरे (३ लाख), पांडुरंग कावणकर (७ लाख १४ हजार), सतीश रहाटे (१ लाख १७ हजार ५००), अनंत सुतार (२ लाख ८२ हजार), दत्ताराम गोवळकर (६० हजार), सरस्वती गोवळकर (२ लाख ९२ हजार ५००), जयवंत रहाटे (१ लाख ५० हजार), शिवाजी रसाळ (५ लाख ८० हजार) यांचा समावेश आहे. या बागांमध्ये चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती.
संगमेश्वरमधील नांदळज येथे वणव्यात आंबा, काजू खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 3:33 PM