अलिबाग : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेविका अॅड. मानसी म्हात्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, तर पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील व माजी नगरसेवक महेश शिंदे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सभेत निवड करण्यात आली. याबाबतची माहिती अलिबाग नगरपरिषदेतील शेकाप गटनेते प्रदीप नाईक यांनी दिली आहे.थेट नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि १७ नगरसेवक असे बहुमत प्राप्त शेकापच्या नव्या शिलेदारांनी याच सभेपासून कामकाजास प्रारंभ केला आहे. नगराध्यक्षपदी विराजमान होताच प्रशांत नाईक यांनी पुढील चारच दिवसांत अलिबाग शहरातील रस्त्यांची कामे करुन सुस्थितीतील रस्ते अलिबागकरांच्या सेवेत रुजू केल्याबद्दल यावेळी नाईक यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
अलिबाग उपनगराध्यक्षपदी मानसी म्हात्रे यांची निवड
By admin | Published: December 29, 2016 2:49 AM