सापांबाबत आजही अनेक गैरसमज

By admin | Published: August 7, 2016 02:58 AM2016-08-07T02:58:32+5:302016-08-07T02:58:32+5:30

नागपंचमीच्या दिवशी नागपूजा केली जाते. परंतु नाग आणि अन्य सापांबाबत आजही अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. सापांच्या संवर्धनासाठी

Many misconceptions about snakes today | सापांबाबत आजही अनेक गैरसमज

सापांबाबत आजही अनेक गैरसमज

Next

- जयंत धुळप, अलिबाग

नागपंचमीच्या दिवशी नागपूजा केली जाते. परंतु नाग आणि अन्य सापांबाबत आजही अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. सापांच्या संवर्धनासाठी जनजागृतीची गरज असल्याचे मत सफर प्राणी शुश्रूषा केंद्राचे संस्थापक, प्राणी व सर्पमित्र गणराज जैन यांनी व्यक्त केले.
भारतात सापांच्या विविध ६०० जाती आढळतात. त्यातील केवळ नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या पाच जातीच विषारी असतात. बाकी सर्व साप बिनविषारी असतात. परंतु सर्वसामान्यांना सर्वच साप विषारी वाटतात, त्यामुळे साप दिसल्यास त्यास मारून टाकण्याकडे कल असतो.
सापांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी ‘गाय ते गोगलगाय’ या व्याख्यानाच्या माध्यमातून जैन महाड-पोलादपूर तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. अशा २२ हजार विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.

५२८ सापांना जीवदान
वर्षभरात गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना यांनी ६७ सापांवर उपचार केले आहेत.विविध जातीच्या ५२८ सापांना पकडून जीवदान दिले आहे. त्यापैकी ३० साप हे नाग (किंगकोब्रा) होते.

नाग वा अन्य साप मानवी वस्तीत सहसा येत नाही, मात्र त्याच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाने अतिक्रमण केल्याने सापांचा संचार मानवी वस्तीत वाढला आहे. लोकवस्तीत साप आढळल्यास अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
- गणराज जैन, सर्पमित्र

Web Title: Many misconceptions about snakes today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.