कर्जत तालुक्यात अनेकांची आरक्षण सोडतीला हरकत, ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:12 AM2021-01-22T08:12:12+5:302021-01-22T08:13:08+5:30
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली.
नेरळ : कर्जत तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली; परंतु सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. गुरुवार, २१ जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या ९ ग्रामपंचायती व अन्य अशा कर्जत तालुक्यातील सुमारे ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली. लोकसंख्येनुसार पहिल्यांदा एस.सी.साठी कर्जत तालुक्यातील रजपे आणि बीड बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले. त्यानंतर ज्या १६ ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले नाही त्यांचे आरक्षण काढण्यात आले. तसेच लहान मुलीकडून तीन चिठ्ठ्या काढून अनुसूचित जमाती महिला अशा ६ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर ज्या १५ ग्रामपंचायतींमध्ये ना. मा. प्र. महिला आरक्षण पडले नाही, त्या जागा आरक्षित करण्यात आल्या व चिठ्ठ्या काढून काही ग्रामपंचायतींमध्ये ना. मा. प्र. महिला व ना . मा प्र. खुला अशा प्रकारे सोडत काढण्यात आली.
तसेच उरलेल्या २१ ग्रामपंचायतींमधून नेरळ आणि वैजनाथ ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आणि त्यानंतर लहान मुलीने ९ ग्रामपंचायतींच्या चिठ्ठ्या काढून त्या काढलेल्या ९ ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि उलेलेल्या ग्रामपंचायती या सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या अशा प्रकारे ग्रामपंचायत सरपंचपदाची सोडत काढण्यात आली; परंतु या सोडतीमध्ये अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी हरकत घेतल्याची पाहायला मिळाली आणि ते जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.
नागोठणे विभागातील चारही ग्रामपंचायतींवर महिला राज -
नागोठणे - ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे आणि ऐनघर या चार ग्रामपंचायतींचा सुद्धा त्यात समावेश होता. या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिलांना लॉटरी लागली आहे. या पदावर डोळा ठेवून बसलेल्या अनेक इच्छुक सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. ग्रामपंचायत आणि सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे १) पळस - सर्वसाधारण महिला,
२) कोंडगाव - सर्वसाधारण महिला, ३) वरवठणे - सर्वसाधारण महिला, ४) ऐनघर -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
सरपंचपदाचे आरक्षण
- पोशीर- सर्वसाधारण महिला
- सालोख तर्फे वरेडी -सर्वसाधारण महिला
- जिते- अनुसूचित
जमाती महिला
- कोल्हारे- नागरिकांचा
मागास प्रवर्ग
- दामात- सर्वसाधारण पुरुष
- हुमगाव - अनुसूचित
जमाती
- अनुसूचित
जमाती
- भिवपुरी - अनुसूचित जमाती महिला
- वैजनाथ- सर्वसाधारण- महिला